Bandra Station Stampede: चेंगराचेंगरीच्या वेळी वांद्रे टर्मिनसवर होती अपुरी कर्मचारीसंख्या; रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार उघड

92
Bandra Station Stampede: चेंगराचेंगरीच्या वेळी वांद्रे टर्मिनसवर होती अपुरी कर्मचारीसंख्या; रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार उघड
Bandra Station Stampede: चेंगराचेंगरीच्या वेळी वांद्रे टर्मिनसवर होती अपुरी कर्मचारीसंख्या; रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार उघड

बांद्रा टर्मिनसवर (Bandra Terminus) फलाट क्रमांक-१ वर वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस (Bandra-Gorakhpur Antyodaya Express) फलाटावर लागण्यापूर्वीच पकडण्याची घाई प्रवाशांच्या अंगाशी आली. रविवारी २९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास एक्स्प्रेस फलाटावर थांबण्यापूर्वीच जागा पकडण्यासाठी धावणाऱ्या प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० प्रवासी जखमी झाले असून, यापैकी दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, ही दुर्घटना घडली तेव्हा बांद्रा स्थानकवर फक्त १४ कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती समोर येत आहे. (Bandra Station Stampede)

मिळालेल्या माहितीनुसार, अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये क्षमतेपेक्षा २२ टक्के अधिक तिकीट विक्री झाली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवणे अपेक्षित होते; पण त्याच कमी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देणारे प्रशासन खरोखरच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत काळजी घेत आहे का? असा सवाल आता रेल्वे प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे. तसेच या घटनेनंतर पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे टर्मिनसवर ३० ते ३५ विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित असतात. तेही घटनास्थळी उपस्थित होते. परंतु चेंगराचेंगरी झाली त्यावेळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ मोजकेच आरपीएफ जवान घटनास्थळी दिसत आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : भाजप+ १५०; काँग्रेस १००+, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचेही ८० उमेदवार घोषित)

‘त्या’ घटनेनंतर अतिरिक्त फौजफाटा तैनात
वांद्रे टर्मिनसवरील दुर्घटनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने त्यांच्या टर्मिनसवर अतिरिक्त फौजफाटा तैनात केला असून, प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीदेखील बंद केली आहे. पश्चिम रेल्वेने अनारक्षित गाडीतील प्रवाशांसाठी होल्डिंग एरियाचीदेखील सुविधा केली आहे. तसेच गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रवाशांना रांगेमध्ये सोडण्यात येत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.