Bangalore Blast : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, ५ जण जखमी

या घटनेनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

246
Bangalore Blast : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, ५ जण जखमी

बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये (Bangalore Blast) आज म्हणजेच शुक्रवार १ मार्च रोजी भीषण स्फोट झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बंगळुरूमधील जुन्या विमानतळ रोडजवळ कुंडलहल्ली परिसरात हा कॅफे आहे.

(हेही वाचा – Shiv Sena MLA disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर होणार पुढील आठवड्यात सुनावणी)

सुदैवाने जीवितहानी नाही :

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये अद्याप (Bangalore Blast) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कॅफेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान :

दुपारी १ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला. यामध्ये कॅफेचे (Rameshwaram Cafe) मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा घातपाताचा कट तर नाही ना, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे. (Bangalore Blast)

(हेही वाचा – Aus Vs NZ Test Record : कॅमेरून ग्रीन आणि हेझलवूड यांची दहाव्या गड्यासाठी विक्रमी भागिदारी)

शहरात नाकाबंदी :

या घटनेनंतर शहरात नाकाबंदी (Bangalore Blast) करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.