- विशेष प्रतिनिधी,मुंबई
मलबारहिलमधील बाणगंगा तलावाचे (Banganga Lake) पुनरुज्जीवीकरण आणि पर्यटनाच्यादृष्टीने सर्वांगिण विकास करण्यात येत असून याअंतर्गत या तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. तलावातील हा गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तलावातील हा गाळ काढण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
(हेही वाचा – BMC : स्मशानभूमींसह रस्त्यावरील पथदिवे जोडणार जीपीएस यंत्रणेला; बिघाड आणि दुरुस्तीची माहिती अधिकारी घेणार वेबवरून)
मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत बाणगंगा तलावाच्या (Banganga Lake) जीर्णोद्धारासाठी विविध कामे केली जाणार आहेत. या जीर्णोद्धार कामांमध्ये बाणगंगा तलावासभोवतालचा परिसर, रामकुंडालगतच्या परिसराची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची तसेच संरक्षक भिंतींची आणि दीपस्तंभाची दुरुस्ती व जीर्णोद्धार, तलावाचे आतील बांधकाम काढणे, बटरफ्लाय झडप दुरुस्ती आणि सुधारणा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. हा प्रकल्प “विशेष प्राधान्य प्रकल्प” म्हणून घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) या तलावाला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्माशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्व असलेले सांस्कृतिक केंद्र आहे.
त्यामुळे या तलावाच्या जीर्णोध्दाराच्या कामांतर्गत तलावातील गाळ काढण्यात येणार असून यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. हा गाळ काढण्याच्या कामांसाठी एन एम इन्फ्रास्टक्चर्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये या तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community