Bangladesh: ढाकामध्ये इस्कॉन मंदिरावर पुन्हा हल्ला, तोडफोडीनंतर धर्मांध मुसलमानांनी जाळली मूर्ती

587
बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्यांकांविरुद्धच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (ISKCON) च्या आणखी एका मंदिराची तोडफोड आणि आग लावल्याची घटना घडली आहे.  यामध्ये इस्कॉन नमहट्टा मंदिरावर हा हल्ला (Attack on ISKCON Namhatta Temple) करण्यात आला. या घटनेत अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.  (Bangladesh)
कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास (Radharaman Das) यांनी त्यांच्या एक्स खात्यावर फोटो शेअर करून घटनेची पुष्टी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात ठेवलेल्या देव-देवतांच्या मूर्ती आणि इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. हे मंदिर ढाक्यातील तुराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. दास यांनी सांगितले की, मंदिराच्या मागे टिनचे छप्पर आहे, जे उखडले आहे. यानंतर पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली आहे.
राधारमण दास घटनेबद्दल काय म्हणाले?

एक्स वरील पोस्टमध्ये राधारमण दास यांनी लिहिले की, ‘बांगलादेशमध्ये (Bangladesh) आणखी एक इस्कॉन नमहट्टा केंद्र जाळण्यात आले. श्री श्री लक्ष्मी नारायण यांच्या मूर्ती आणि मंदिरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. हे केंद्र ढाका (Dhaka) येथे आहे. शनिवारी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान, हरी कृष्ण नमहट्टा संघाचे श्री श्री राधा कृष्ण मंदिर आणि श्री श्री महाभाग्य लक्ष्मी नारायण मंदिराला मुस्लिम धर्मांधानी आग लावली. हे मंदिर ढाका जिल्ह्यातील धौर गावात आहे आणि तुराग पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते.

(हेही वाचा – MLA Oath Ceremony : काही हिंदी तर एक सिंधी, पण विधानसभेत डंका मराठी-संस्कृतचाच)

हिंदू मंदिरांवर हल्ले
आठवडाभरापूर्वी भैरब येथे इस्कॉनचे केंद्र पाडण्यात आले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही बेशिस्त नागरिकांनी मंदिराच्या आवारात घुसून तोडफोड केली होती. बांगलादेशात शेख हसीना (Sheikh Hasina) सत्तेतून गेल्यानंतर हिंदूंवर सातत्याने हल्ले होताना दिसत आहेत. या विरोधात हिंदू संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.