बांगलादेशात इस्कॉनशी (ISKCON) संबंधित लोकांना सरकारी यंत्रणेच्या दबावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अशातच भारतात येणाऱ्या इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना बांगलादेश (Bangladesh) प्रशासनाने रोखल्याची बातमी समोर आली आहे. सर्व वैध कागदपत्रे असूनही इस्कॉनच्या (ISKCON) सदस्यांना भारतात येण्यापासून रोखले आहे. इस्कॉनच्या सदस्यांना बांगलादेशी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेपाशी बेनापोल बंदरावर (Benapole port) संशयास्पद हालचालीमुळे रोखल्याचे वृत्त तिथल्या माध्यमांनी दिले आहे.
( हेही वाचा : Hit and Run Case : मुलुंडमध्ये ‘हिट अँड रन’ ; महिलेचा मृत्यू, चालक फरार)
याप्रकरणी बांगलादेशी वृत्तसंस्थांना बांगलादेशी इमिग्रेशन चेक-पोस्टचे अधिकारी इम्तियाज मोहम्मद अहसानुल म्हणाले, आम्ही ५४ बांगलादेशी प्रवाशांना त्यांच्या भारतात जाण्याच्या संशयास्पद हेतूंमुळे प्रवासाची परवानगी नाकारली आहे. मात्र त्यात प्रवास करण्यापासून रोखलेल्या इस्कॉनच्या (ISKCON) इतर ९ सदस्यांचा उल्लेख नाही.
दरम्यान याप्रकरणी इस्कॉन (ISKCON) कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या सीमेवर बांगलादेशी (Bangladesh) पोलिसांनी रोखलेले लोक इस्कॉनचे (ISKCON) सदस्य आहेत. बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थितीमुळे त्यांनी भारतातील तीर्थयात्रेसाठी येण्याचा निर्णय घेतला. पंरतु पोलिसांनी दि. ३० नोव्हेंबरला ९ आणि १ डिसेंबरला ५३ सदस्यांना रोखले. मात्र वैध कागदपत्रे असतानाही दुसऱ्या देशात जाण्याची परवानगी कशाच्या आधारावर नाकारली जात आहे?, असा सवाल दास यांनी केला. त्यादरम्यान गलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी चिन्मय कृष्ण दास (Chinmoy Krishna Das) यांच्यासह १९ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community