PM Narendra Modi यांच्या पोस्टवर बांगलादेशला पोटशूळ; सल्लागार म्हणतात, भारत फक्त…

179
नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे PM Narendra Modi यांच्याकडून कौतुक

भारत आणि बांगलादेश यांनी १६ डिसेंबर १९७१ च्या युद्धाचा ५३ वा वर्धापन दिन साजरा केला. या विजयासंदर्भात दोन्ही देशांनी कोलकाता आणि ढाका येथे कार्यक्रमही आयोजित केले होते. १९७१ च्या युद्धाच्या ऐतिहासिक विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी युद्धात सहभागी झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करत भारताच्या विजयात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले होते.

भारताविरुद्ध लढा सुरु ठेवण्याची भाषा

१९७१ च्या युद्धात भारताच्या विजयाबद्दल आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कायदा मंत्री आसिफ नजरुल यांनी मोदींच्या या पोस्टवर आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा भाग असलेले सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले की, मी याचा तीव्र निषेध करतो. १९७१ चा विजय हा बांगलादेशचा विजय आहे. भारत त्यात फक्त मित्र होता. हे बांगलादेशचे स्वातंत्र्य युद्ध होते. हे पाकिस्तानपासून बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे युद्ध (bangladesh mukti sangram) होते. पण हे युद्ध केवळ भारताचेच होते आणि ते त्यांचे यश असल्याचा दावा मोदींनी केला. बांगलादेशच्या अस्तित्वाला त्यांच्या भाषणातून आव्हान देण्यात आले आहे. भारताकडून येणाऱ्या या धोक्याविरुद्ध आपण लढा सुरू ठेवला पाहिजे.”

नजरुल यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टसोबत पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) पोस्टचा स्क्रीनशॉटही जोडला आहे. हसनत अब्दुल्लाने पंतप्रधान मोदींच्या पोस्टवरून नाराजी व्यक्त केली.

काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट ?

आज विजय दिवसाच्या दिवशी, १९७१ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात (bangladesh liberation war) योगदान देणाऱ्या त्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा आम्ही आदर करतो. हा दिवस त्यांच्या विलक्षण शौर्याला आदरांजली आहे. त्यांचे बलिदान पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देईल आणि आपल्या देशाच्या इतिहासात खोलवर जडत राहील,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.दरम्यान, या युद्धात भारताने पाकिस्तानी लष्कराला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पाकिस्तानच्या ९३,००० सैनिकांना भारतीय लष्कराने आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. या विजयानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला, जो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.