Bangladesh मध्ये हिंदू विद्यार्थ्याची हत्या; १२ कट्टरपंथींनी विद्यार्थ्याची हत्या केल्याची स्थानिकांची माहिती

94
Bangladesh मध्ये हिंदू विद्यार्थ्याची हत्या; १२ कट्टरपंथींनी विद्यार्थ्याची हत्या केल्याची स्थानिकांची माहिती
Bangladesh मध्ये हिंदू विद्यार्थ्याची हत्या; १२ कट्टरपंथींनी विद्यार्थ्याची हत्या केल्याची स्थानिकांची माहिती

पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंदूंची (Hindu) हत्या, बलात्कार, मंदिरावर हल्ले मोठ्या प्रमाणात बांगलादेशात होत आहेत. त्यातच बांगलादेशात हिंदू विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. त्याच वेळी, मोहम्मद युनूस (Mohammed Yunus) यांच्या नेतृत्वाखालील इस्लामिक देशाचे अंतरिम सरकार अल्पसंख्याकांविरुद्ध धार्मिक हिंसाचाराला नकार देत आहे. (Bangladesh)

( हेही वाचा : Stars @Ranji Trophy : रोहित, रिषभ दुसऱ्या डावांतही फ्लॉप, जडेजा चमकला

स्थानिक वृत्त संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यांचे नाव अर्णब कुमार सरकार (Arnab Kumar sarkar) (२६) असे आहे. अर्णब हा खुलना विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत होता. अर्णब हा सोनाडांगा परिसरातील अबू अहमद रोड येथील रहिवासी नितीश चंद्र सरकार (Nitish Chandra sarkar) यांचा मुलगा आहे. . तो बोसपुरा कॉलेजिएट स्कूलजवळ राहत होता. चहाच्या टपरीवर चहा पीत असताना त्याच्या डोक्यात गोळी लागल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. (Bangladesh)

सोनाडांगा पोलिस स्टेशनचे प्रभारी शफीकुल इस्लाम यांनी सांगितले की, दि. २३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता अर्णब तेंटुलतला चौकात असलेल्या एका चहाच्या टपरीवर चहा पीत होता. त्याच वेळी काही हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी त्याच्या डोक्याला लागली आणि तो जागीच मृत्युमुखी पडला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. (Bangladesh)

घटनेनंतर स्थानिकांनी अर्णबला सिटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, खुलना शहर पोलिस (दक्षिण विभाग) उपायुक्त मोहम्मद मोनिरुज्ज्मान यांनी याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. ते म्हणाले की, “दहशतवाद्यांनी एका विद्यार्थ्याला गोळ्या घालून ठार मारले. त्याच्या हत्येमागील कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.” (Hindu)

दरम्यान खुलना महानगर पोलिसांचे एडीसी मोहम्मद अहसान हबीब म्हणाले की, मारेकऱ्यांची ओळख पटवून घेतली जात असून आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. स्थानिकांचे म्हणणे आहे की १०-१२ हल्लेखोरांचा एक गट अनेक मोटारसायकलींवर आला आणि त्यांनी ही घटना घडवून आणली. (Bangladesh)

याआधी ५ जानेवारी रोजी बांगलादेशातील फरीदपूर येथे अज्ञात हल्लेखोरांनी एका हिंदू पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले होते. यामध्ये पत्रकाराच्या घरातील महिला गंभीररित्या जखमी झाली होती. ही घटना मधुखली गावात घडली. त्याचप्रमाणे, चितगावमधील पटेंगा काठगढ येथे, प्रांत तालुकदार नावाच्या एका हिंदू तरुणाचे मुस्लिम जमावाने प्रथम अपहरण केले आणि नंतर त्याला घेऊन जाऊन त्याच्यावर असंख्य अत्याचार केले. डिसेंबर २०२४ मध्येही अशीच एक घटना घडली होती, जेव्हा मुस्लिम जमावाने आकाश दास नावाच्या तरुणावर ईशनिंदेचा आरोप करत १३० हिंदू (Hindu) घरे आणि २० मंदिरे जाळली होती. (Bangladesh)

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, नरैलमध्ये ५२ वर्षीय हिंदू (Hindu) महिला बसना मलिक यांचा गूढ मृत्यू झाला. मुस्लिम कट्टरपंथीयांनी बसनावर सामूहिक बलात्कार केला. यामुळे बसना मलिक मानसिकरित्या तणावात आली आणि तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. यानंतर, पोलिसांनी प्रकरण दाबण्यास सुरुवात केली आणि मृताचे चारित्र्यहनन सुरू केले. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या अशा शेकडो घटना घडत असल्याची माहिती दिली. (Bangladesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.