देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले इस्कॉनचे (International Society for Krishna Consciousness) हिंदू पुजारी चिन्मय कृष्णदास (Chinmoy Krishna Das) ब्रह्मचारी यांच्यासह इस्कॉनशी संबंधित १७ हिंदूंची बँक खाती बांगलादेश (Bangladesh) सरकारने गोठवली आहेत. मिळालेल्या अहवालानुसार, बांगलादेशात (Bangladesh) बँकेच्या शाखा असलेल्या बांगलादेश फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिटने (Bangladesh Financial Intelligence Unit) बँकांना इस्कॉन, बांगलादेशशी (Bangladesh) संबंधित १७ लोकांची खाती गोठवण्याचे निर्देश जारी केले आहेत.
( हेही वाचा : दुचाकीस्वार विना Helmet असेल तर सहप्रवाशावरही कारवाई होणार)
इस्कॉनवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ही सरकारने सूडबुद्धीने कृष्णदास (Chinmoy Krishna Das) यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप हिंदू समुदायाने केला आहे. बीएफआययूने बँकांना हिंदू संघटनांशी संबंधित १७ व्यक्तींच्या खात्यांवरील सर्व व्यवहार स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. (Bangladesh)
या १७ लोकांमध्ये इस्कॉनचे माजी नेते चंदन कुमार धर (Chandan Kumar Dhar),कार्तिक चंद्र डे, अनिक पाल, सोरोज रॉय, सुशांत दास, विश्व कुमार सिंघा, चंडीदास बाला, जयदेव कर्माकर, लिपी राणी कर्माकर, सुधामा गौस दास, लख्खन कांती दास, प्रियतोष दास, रुपन कुमार धर यांच्यासह बीएफआययूने लक्ष्य केलेल्या इतर लोकांचा यामध्ये समावेश आहे.(Bangladesh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community