बांगलादेशात (Bangladesh) ऑगस्टमध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार पाडण्यात आल्यापासून हिंदूंवर हल्ले होत आहेत. हिंदूंची मंदिरे, घरे यांना लक्ष्य करून मोडतोड, जाळपोळ केली जात आहे. ही मालिका थांबलेली नसतांना बांगलादेश सरकारने त्याकडे डोळेझाक करत, आमच्या देशात हिंदू सुरक्षित आहेत; मात्र भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, असा आरोप केला आहे. भारताने हिंदूंचे रक्षण करण्याचे बांगलादेशाच्या सरकारला आवाहन केले होते, त्यावर बांगलादेश सरकारकडून भारताला उलट उत्तर देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Kash Patel: डीप स्टेट चे विरोधक अशी प्रतिमा असणारे काश पटेल अमेरिकन एफबीआय चे प्रमुख… डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा मास्टर स्ट्रोक)
बांगालादेश सरकारचे भारतावर आरोप
बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे कायदेशीर गोष्टींचे सल्लागार आसिफ नजरूल यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले की, अल्पसंख्य मुसलमान समाजावर अत्याचारांच्या अगणित घटना भारतात घडत रहातात; पण त्यांना कसलाही पश्चाताप किंवा लाज नाही. भारताचा हा दुटप्पीपणा निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. बहुतेक बांगलादेशींना असा विश्वास आहे की, हे अंतरिम सरकार पूर्वीच्या अवामी लीग (Awami League) सरकारइतकेच चांगले असेल. ते देशातील अल्पसंख्य समुदायांना अधिक चांगली सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे.
बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांचे प्रसिद्धमाध्यम सचिव शफीकुल इस्लाम यांनी म्हटले की, बांगलादेशामध्ये हिंदू सुरक्षित आहेत. तसेच इस्कॉनवर बंदी घालण्याचा कोणताही हेतू नाही. सरकार प्रत्येक समुदायाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहा. अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाविषयी भारत दुटप्पी मापदंड अवलंबत आहे. चिन्मय प्रभु यांना निष्पक्षपणे बाजू मांडण्यासाठी संधी मिळेल. बांगलादेशामध्ये हिंदु सुरक्षित आहेत. अफवांवर लक्ष देऊ नका, असा कांगावा बांगलादेश सरकारने केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community