बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्येही सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरांवर अजूनही हल्ले होत आहेत. आता दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे. (Bangladesh Hindu)
बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टच्या रात्री दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे. रात्री उशिरा काही उपद्रवी लोकांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुर्गा पूजेसाठी मातीपासून बनवण्यात आलेल्या मातेच्या मूर्तीची विटंबना केली. शेरपूर जिल्ह्यातील हा भाग मेघालय सीमेला लागून आहे.आरोपींनी पेट्रोल शिंपडून मूर्ती जाळण्याचाही प्रयत्न केला, मात्र आग लागू शकली नाही, अशी माहिती मंदिर समितीचे सरचिटणीस यांनी दिली.
(हेही वाचा – Paris Paralympic Games : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला पदक विजेत्यांशी संवाद)
हिंदूंवरील हल्ल्याच्या घटनांचा आकडा 205 वर
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चौकशी केली. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. तपासानंतर उपद्रवी हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर अशा अनेक बातम्या सातत्याने समोर येत आहेत. हिंदूंच्या घरांना आणि मंदिरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. यामुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेख हसीना सरकार पडल्यानंतर देशात हिंसाचार माजला आहे. 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवरील हल्ल्याच्या घटनांचा आकडा 205 वर पोहोचला आहे.
कट्टरपंथी मुस्लीम लोक अजूनही जमीन, मालमत्ता, सोने, पैसे आणि मुलींची मागणी करत आहेत. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. यामुळे अक्षरशः लपून राहावे लागत आहे, अशी भावना एका बांगलादेशी हिंदूने व्यक्त केली आहे. (Bangladesh Hindu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community