बांग्लादेशात दुर्गा पुजेत राक्षसांनी आणले विघ्न! इस्लामिक अतिरेक्यांचा हल्ला

129

बांग्लादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू लोकांनी नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गा पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पण, त्याला गालबोट लागलं ते इस्लामिक अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने. उत्साहपूर्ण चाललेल्या या पूजेत फेसबूकवरुन पसरवल्या गेलेल्या अफवेवरुन इस्लामिक अतिरेक्यांनी या पुजेच्या कार्यक्रमावर हल्ला चढवला आणि  निरपराध लोकांचा बळी गेला.

असा रचला कट

हिंदुंनी कुराणचा अपमान केल्याची कथित फेसबूक पोस्ट बुधवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर धार्मिक कट्टरपंथी रस्त्यावर आले आणि त्यांनी अनेक दुर्गा पंडालची तोडफोड केली. कोणीतरी कुरानची प्रत सकाळी नानुआ दिघी पार येथील दुर्गा पूजा मंडपात ठेवली होती. तेव्हा तिथला सुरक्षारक्षक झोपला होता. काही हिंदूविरोधी लोकांनी याचे फोटो काढले आणि पळून गेले. हेच फोटो काही तासांच्या आत फेसबूकच्या माध्यमातून वणव्यासारखे पसरवण्यात आले. अशी माहिती कुमिल्ला महानगर पूजा उद्घापोन समितीचे सरचिटणीस शिबू प्रसाद दत्ता यांनी दिली. तसेच कुरानचा अपमान केल्याचा दावा सुद्धा त्यांनी फेटाळून लावला.

अनेक ठिकाणी हल्ले

बांग्लादेशमधील चांदपूरच्या हाजीगंज, चॅटोग्रामच्या बांशखली, चापैनवाबगंजच्या शिबगंज आणि कॉक्सबाजारच्या पेकुआ येथील मंदिरांवर व हिंदू भाविकांवर अत्याचार करण्यात आला. या हिंसक चकमकीत तब्बल तीन हिंदू ठार झाल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. स्थानिक हिंदूंनी ट्विटरवर हल्ल्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

https://twitter.com/UnityCouncilBD/status/1448215985987600387?s=20

“परिस्थिती भयानक आहे !! शिलपारा, कॉक्स बाजार मधील 150 कुटुंबांवर हल्ले, व्यापक तोडफोड, लूट, नोआखलीतील हातियाची तोडफोड, नगरपालिका कालीमंदिरातील मूर्तींची तोडफोड, हल्ला तोडफोड, महिलांची छेडछाड, चांदपूरमध्ये 2 लोक मृत आढळले आहेत, असे ट्वीट हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करत, बांग्लादेश जातिओ हिंदू महाजोतेचे महासचिव अधिवक्ता डॉ. गोबिंदा चंद्र प्रामाणिक यांनी केले.

 

https://twitter.com/JatayuOSINT/status/1448360559162789892?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1448360559162789892%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.opindia.com%2F2021%2F10%2Fbangladesh-islamic-extremists-vandalize-multiple-durga-puja-pandals-violence-against-hindus%2F

हिंदुत्ववादी न्यूज पोर्टल ‘हिंदू व्हॉईस’ ने दुर्गेची मूर्ती नदीत फेकल्याचा अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुस्लिम जमावाने बांग्लादेशातील कोमिल्ला येथे 9 दुर्गा मंडप आणि मूर्ती पाडल्या आहेत. शेकडो कट्टरपंथी मुस्लिमांनी आज सकाळी हल्ला केला. हा हल्ला अजूनही सुरू आहे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. हिंदू भयभीत झाले आहेत. पोलिस जमावाला नियंत्रित करण्यात अपयशी ठरले आहेत.

 

बांग्लादेशात हिंदूंविरुद्ध इतका द्वेष का आहे? हिंदू जन्माने बांग्लादेशात राहतात. 1971 मध्ये ज्यांनी आपला जीव गमावला त्यापैकी बहुतेक हिंदू होते. बांग्लादेशच्या हिंदुंनी मुस्लिमांना त्यांचे भाऊ मानले. 8% हिंदू 90% मुस्लिमांच्या समस्यांचे कारण कसे असू शकतात?, असे कौन्सिलने अजून एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/UnityCouncilBD/status/1448274119024332804?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1448274119024332804%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.opindia.com%2F2021%2F10%2Fbangladesh-islamic-extremists-vandalize-multiple-durga-puja-pandals-violence-against-hindus%2F

13 ऑक्टोबरला ‘काळा दिवस’ म्हणत आणि बांगलादेशच्या हिंदूंना वाचवण्याची हाक देत कौन्सिलने त्यांच्या ताज्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत काय घडले ते आम्ही ट्विटमध्ये सांगू शकत नाही. बांगलादेशच्या हिंदूंनी काही लोकांचे खरे चेहरे पाहिले. आम्हाला माहित नाही की भविष्यात काय होईल. पण बांगलादेशचे हिंदू 2021 मध्ये दुर्गा पूजा कधीही विसरणार नाहीत.

https://twitter.com/UnityCouncilBD/status/1448477757554450435?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1448477757554450435%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.opindia.com%2F2021%2F10%2Fbangladesh-islamic-extremists-vandalize-multiple-durga-puja-pandals-violence-against-hindus%2F

पोस्ट आणि व्हिडिओ ताबडतोब काढून टाकण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. आम्ही 100 पेक्षा जास्त फेसबूक लिंक काढून टाकण्याची विनंती केली आहे. आम्हाला आशा आहे की ते लवकरच केले जातील. मंत्रालयाने फेसबूक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा दावा बांग्लादेशचे दूरसंचार मंत्री मुस्तफा जब्बार यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.