बांगलादेशात Sheikh Hasina यांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला; ३ समर्थकांना अटक

47
बांगलादेशात Sheikh Hasina यांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला; ३ समर्थकांना अटक
बांगलादेशात Sheikh Hasina यांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला; ३ समर्थकांना अटक

बांगलादेशात (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) सत्तेतून पायउतार होताच, मोहम्मद युनूस सरकारने दडपशाहीचे तंत्र अवलंबले आहे. त्यात अवामी लीगचे (Awami League) मतदार, पक्षाचे सदस्य आणि अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाले आहे. अशातच दि. २१ मार्च रोजी सायंकाळी अवामी लीगशी (Awami League) संबंधित असलेल्या लोकांनी ढाक्यातील धनमोंडी परिसरात एका रस्त्यावर मोर्चा काढला. ज्यात पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : Dharavi Redevelopment Project : माटुंगा रेल्वे स्थानकाशेजारील रेल्वेच्या जागेवर रचली जाणार धारावीच्या विकासाची विट)  

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आणि स्थानिकांनी अवामी लीगच्या (Awami League) रस्त्यावरील आंदोलनाला रोखले. ज्यात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी जय बांगलाचे नारे दिले होते. अशातच काही धर्मांधांनी रॅलीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी अवामी लीगच्या काही सदस्यांना तसेच काही कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये जुबो महिला लीगचा कार्यकर्ता लबोनी या अवामी लीगचा कार्यकर्ता सिराजुल आणि बीसीएलचा कार्यकर्ता राजू यांचा समावेश आहे. (Sheikh Hasina)

दरम्यान, डीएमपीचे अतिरिक्त उपायुक्त ज्वेल राणा (Jewel Rana) म्हणाले की, मोहम्मदपूर (Mohammadpur) पोलिसांनी विद्यार्थी आणि लोकांच्या मदतीने अवामी लीगच्या आंदोलनातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ते म्हणाले की, इफ्तारनंतर सुमारे ४०-५० अवामी लीग आणि बीसीएल कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्यात आली. अशातच अटक करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस चौकशी करत आहेत. (Awami League)

दरम्यान, मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन करून अनेक महिने होऊन गेले. तरीही हिंदू अल्पसंख्यांकावरील अन्याय अत्याचार थांबत नाहीत. धर्मांधांकडून मूर्तींची विटंबना करणे, हिंदू सण-उत्सव साजरे करण्यास विरोध असा अन्याय हिंदूंवर होत आहे. (Sheikh Hasina)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.