Bangladesh Protests : बांगलादेशमध्ये अस्थिरतेच्या काळात पोलीसच संपावर; केली सुरक्षेची मागणी

113
आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र; Bangladesh मधील मान्यवरांनी सांगितले वास्तव

शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देश सोडल्यानंतर आतापर्यंत 400 पोलीस ठाण्यांवर हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशाची पोलीस संघटना ‘बांगलादेश पोलीस सर्व्हिस असोसिएशन’ने म्हटले की, जोपर्यंत प्रत्येक पोलिसाची सुरक्षा सुनिश्चित केली जात नाही, तोपर्यंत पोलीस कर्मचारी संपावरच राहणार आहेत. बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलिसांनी संप पुकारला आहे. सुरक्षेच्या मागणीसाठी बांगलादेशातील पोलीस संपावर गेले आहेत. (Bangladesh Protests)

(हेही वाचा – प्रभादेवीत Shivsena आणि उबाठा गटांचे कार्यकर्ते भिडले; बोर्डावरील धनुष्यबाण चिन्हावरून वाद)

भारताचे परिस्थितीवर लक्ष

बांगलादेशातील सतत बिघडत चाललेल्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. संसद भवनात झालेल्या या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सचिव अजित डोवाल आणि गृह सचिव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बांगलादेशातील परिस्थिती आणि सीमा सुरक्षा यावर चर्चा झाली. भारत बांगलादेशाच्या लष्करप्रमुखांच्या संपर्कात असून, तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.

भारत-बांगलादेश सीमा सील

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सतर्क आहे. बीएसएफने सोमवार, ६ ऑगस्ट रोजीच 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश संपूर्ण सीमा सील करण्यात आली आहे. बांगलादेशची सर्वाधिक 2200 किमी लांबीची सीमा पश्चिम बंगालशी लागून आहे आणि हाच भाग अत्यंत संवेदनशील आहे. (Bangladesh Protests)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.