बांगलादेशात हिंसाचाराच्या घटना अद्यापही सुरु आहेत. हिंसाचाराच्या घटनानंतर शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस (Mohammed Yunus) यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं. पण यानंतरही बांगलादेशमधील परिस्थिती पूर्व पदावर आलेली दिसत नाही. अशातच बांगलादेशातील आंदोलकांनी 1971 च्या युद्धाशी संबंधित राष्ट्रीय स्मारक पाडले. त्यामुळे मुजीबनगरमध्ये असलेले हे स्मारक भारत-मुक्तीवाहिनी लष्कराच्या (Bharat-Mukti Vahini Army Memorial) विजयाचे आणि पाकिस्तानी लष्कराच्या पराभवाचे प्रतीक मानले जाते. (Bangladesh Violence)
…आणि हजारो सैनिकांसह आत्मसमर्पण केलं
16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल एएके नियाझी (AAK Niazi) यांनी हजारो सैनिकांसह भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यांनी भारतीय लष्कराचे ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट-जनरल जगजित सिंग (Jagjit Singh) अरोरा यांच्यासमोर कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्यांची प्रतिमा या स्मारकात कोरलेली आहे. दरम्यान हिंसक आंदोलकांनी या स्मारकात प्रवेश करत ऐतिहासिक स्मारकाची नासधूस केली. संबंधित स्मारकाचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. (Bangladesh Violence)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community