Bangladeshi Hindu : बांगलादेशने हिंदूंना संरक्षण देण्याची भारत सरकारची मागणी

94
Bangladeshi Hindu : बांगलादेशने हिंदूंना संरक्षण देण्याची भारत सरकारची मागणी
Bangladeshi Hindu : बांगलादेशने हिंदूंना संरक्षण देण्याची भारत सरकारची मागणी

नवरात्रोत्सावादरम्यान बांगलादेशात जिहादी गुंडांकडून दुर्गा पूजा मंडपांवर हल्ल्याची घटना घडली. याप्रकरणी भारताने शनिवारी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच बांगलादेश सरकारने अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे. (Bangladeshi Hindu)

यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, ढाका येथील तंतीबाजार येथील दुर्गा मंडपावरील
हल्ला आणि सतीखीरा येथील प्रसिद्ध जेशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्या चोरीबद्दल भारताने गंभीर चिंता व्यक्त केली. या घटना निंदनीय आहेत आणि मंदिरे आणि देवतांच्या विध्वंसाचे उदाहरण आहे. भारताने बांगलादेश सरकारला त्वरित कारवाई करण्याचे आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे आवाहन भारताने केले. बांगलादेशमध्ये हिंदू धार्मिक (Bangladesh Hindu religious site) स्थळांना लक्ष्य करण्यात आलेल्या घटनांनंतर हे वक्तव्य आले आहे. ढाक्याच्या तंटीबाजार भागात शुक्रवारी रात्री एका मंदिराला आग लागल्याने पूजा करणाऱ्या भाविकांमध्ये घबराट पसरली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या गोंधळात 5 जण जखमी झाले आहेत. तसेच, बांगलादेशच्या दक्षिण-पश्चिम सतीखिरा जिल्ह्यातील दुर्गापूजेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भेट दिलेला सोन्याचा मुकुट हिंदू मंदिरातून चोरीला गेला.

(हेही वाचा – Baba Siddique यांच्यावर तिघांकडून गोळीबार; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

बांगलादेश पोलिसांनी या महिन्यात नवरात्रोत्सवादरम्यान घडलेल्या 35 हिंसक घटनांप्रकरणी 17 जणांना अटक केली आहे. बांगलादेशचे पोलीस महानिरीक्षक मोइनुल इस्लाम यांनी याबाबत सांगितले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जो कोणी हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.