सिल्लोडमध्ये बांगलादेशींचे वास्तव्य; Kirit Somaiya यांच्या अर्जानंतर जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

41
सिल्लोडमध्ये बांगलादेशींचे वास्तव्य; Kirit Somaiya यांच्या अर्जानंतर जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी
सिल्लोडमध्ये बांगलादेशींचे वास्तव्य; Kirit Somaiya यांच्या अर्जानंतर जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

सिल्लोड (Sillod) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून वाटप करण्यात आलेल्या जन्म- मृत्यू प्रमाणपत्रांच्या फायलींसोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माहिती अधिकारात मागितल्या आहेत. ही माहिती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात चार दिवसांपासून शोधाशोध सुरू आहे. शिवाय उशिराने मागणी केलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे अधिकार न्यायालयाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर या कार्यालयाकडून वाटप झालेल्या २८८६ प्रमाणपत्रांची फेरतपासणी होणार आहे. शिवाय १९१७ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Election Commission : खोट्या बातम्यांमुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होतोय ; विविध देशांतील निवडणूक आयुक्तांचे मत)

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोहिम उघडली आहे. मालेगाव येथेही त्यांनी कागदपत्रांची छाननी केली होती. आता सिल्लोड या मुसलमानबहुल भागातील कागदपत्रांची छाननी त्यांनी सुरु केल्याचे दिसते.

उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून वाटप करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांवर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतल्यानंतर उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी वाटप केलेल्या या सर्व प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीचे आदेश जारी केले असून, तपासणी सुरु झाली आहे.

मागील आठवड्यात माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना भेटले होते. या वेळी त्यांनी जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा जास्त बांगलादेशी व रोहिंग्या नागरिक वास्तव्य करत असल्याचा गंभीर आरोप केला. या दरम्यान त्यांनी सिल्लोड तालुक्यात ४७३० बांगलादेशी व रोहिंग्या (Rohingya) नागरिक असल्याबाबतचा दावाही केला होता. या अनुषंगाने ते सोमवार, २० जानेवारी या दिवशी सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याशी २ तास चर्चा केल्यावर त्यांनी या दरम्यान कागदपत्रांची तपासणी केली. सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची माहिती मागवली आहे.

कन्नड व खुलताबाद तालुक्यात ५८३ जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. नवीन आदेशामुळे कन्नड उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात कन्नड तालुक्यातील ३३० आणि खुलताबाद तालुक्यातील २५३ असे एकूण ५८३ जन्म मृत्यू प्रमाणपत्रांची सुनावणी व आदेश प्रलंबित आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.