बेंगळुरुच्या (Bengaluru) एनआयएच्या विशेष न्यायालयाने दि. ३० डिसेंबर रोजी बांगलादेशी नागरिक जाहिदुल इस्लाम (jahidul islam) उर्फ कौसरला भारतात दहशतवादी कारवायांना चालना दिल्याने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. तसेच आरोपीकडून ५७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जाहिदुलला (jahidul islam) जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) चा ‘अमीर’ बोलले जाते, तो भारतात दहशतवादी नेटवर्क चालवत होता. (Bangladeshi Infiltration)
( हेही वाचा : Thirty First Party : अपघात रोखण्यासाठी बार, पब आणि पार्टीच्या बाहेर पोलीस तैनात)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहिदुल इस्लाम (jahidul islam) २०१४ मध्ये बेकायदेशीरपणे भारतात आला. बांगलादेशात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्यानंतर तो २००५ मध्ये भारतात आला होता.येथे त्याने जेएमबी प्रमुख सलाहुद्दीन सालेहीनसोबत ऑक्टोबर २०१४ मध्ये पश्चिम बंगालच्या (West Bengal) वर्धाबन जिल्ह्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. बर्दवानच्या खागरागड भागात झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. स्फोटानंतर जाहिदुल (jahidul islam) आणि त्याचे साथीदार बेंगळुरूला पळून गेले.(Bangladeshi Infiltration)
बेंगळुरूमध्ये (Bengaluru) लपून बसलेल्या जाहिदुलने (jahidul islam) पश्चिम बंगाल आणि आसाममधील मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यास सुरुवात केली. त्यांने त्यांना जेएमबीच्या भारतविरोधी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित केले. २०१८ च्या बोधगया बॉम्बस्फोटामागे जाहिदुल आणि त्याच्या साथीदारांचा हात असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या भेटीदरम्यान हा स्फोट घडवून आणण्यात आला होता, जो जेएमबीच्या कटाचा एक भाग म्हणून करण्यात आला होता.
जाहिदुल (jahidul islam) आणि त्याच्या साथीदारांनी दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने बेंगळुरूमध्ये चार दरोडे घातले. या दरोड्यांमधून जप्त केलेल्या पैशांचा वापर दारूगोळा खरेदी, तळांची व्यवस्था आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जात असे. एनआयएने २०१९ मध्ये प्रकरण ताब्यात घेतले आणि दहशतवादी नेटवर्कवर कारवाई सुरू केली. तपासादरम्यान, एनआयएने जाहिदुल आणि त्याच्या साथीदारांच्या लपलेल्या ठिकाणांवरून हातबॉम्ब, टायमर उपकरणे, इलेक्ट्रिक सर्किट्स आणि आयईडी बनवण्यासाठी वापरले जाणारे स्फोटक साहित्य जप्त केले.
एनआयएने या प्रकरणात ११ आरोपींना दोषी ठरवले आहे. त्यापैकी जाहिदुलला कट, दरोडा, खंडणी आणि दारूगोळा खरेदी यासारख्या गंभीर आरोपांमध्ये दोषी आढळले आहे. जाहिदुल आणि त्याचे नेटवर्क भारतात जेएमबीचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सक्रिय असल्याचे एनआयएने म्हटले आहे. फरार जेएमबी प्रमुख सलाहुद्दीन सालेहीनसारख्या या प्रकरणाशी संबंधित इतर दहशतवाद्यांना पकडण्याचे आव्हान अजूनही कायम आहे. निष्पाप तरुणांना कट्टरपंथी बनवून दहशतवादी संघटना कशाप्रकारे आपले मनसुबे राबवतात हे या घटनेवरून दिसून येते आणि त्यांच्या विरोधात सतर्क राहण्याची गरज आहे.(Bangladeshi Infiltration)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community