मुंबई – काळाचौकी (Kalachowki) आणि गोवंडीतील शिवाजी नगर (Shivajinagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील २४ तासात ९ बांगलादेशी घुसखोराना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेले बांगलादेशी हे मजूर म्हणून मुंबईत विविध ठिकाणी कामे करीत होते, काही बांगलादेशी मागील १५ ते २० वर्षांपासून मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bangladeshi infiltration)
( हेही वाचा : बंजारा समाजाच्या अडचणींना दूर करण्याला प्राधान्य; लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे प्रतिपादन)
मोहम्मद सलाम सरदार उर्फ अबू सलाम, सोहाग सफीकुल सरदार उर्फ मोहम्मद सोहाग सफीकुल इस्लाम, मोहम्मद शमीम मुराद हसन अली उर्फ समीम मुल्ला, मोहम्मद अलामिन लतीफ मोरोल आणि आशुरा खातून असे काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पाच जणांची नावे आहेत. हुसेन मोफिजल शेख,लिटोन मोफिजल शेख, अन्सार अली सरदार, सुलेमान रहीम शेख अशी शिवाजी नगर पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. (Bangladeshi infiltration)
काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला आणि तेथून ते मुंबईत आले. या ठिकाणी ते वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत होते. मुंबईत मजुरी आणि रोजंदारीचे काम करणाऱ्या या बांगलादेशी घुसखोराना सीमा ओलांडण्यापासून त्यांना मुंबईत राहण्यासाठी मदत करणाऱ्यांची माहिती काढुन त्यांचा शोध घेत आहे. (Bangladeshi infiltration)
काळाचौकी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सर्वात प्रथम आशुरा खातून (Ashura Khatun) या बांगलादेशी महिलेला चिंचपोकली पूर्वे येथून अटक केली होती, तिच्याकडे केलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत, काळाचौकी पोलिसांच्या दहशतवाद विरोधी सेलने इतर चौघांना विविध परिसरातून अटक केली.चौकशीदरम्यान, आशुराने कायदेशीर कागदपत्रां शिवाय मुंबईत राहणारी बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. तिने सांगितले की तिने मुलकी नदीमार्गे सीमा ओलांडली होती आणि तिच्याकडे कोणतेही वैध ओळखपत्र नव्हते. दरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी लोटस जंक्शन येथून चौघांना अटक केली आहे, अटक करण्यात आलेले चौघे मागील १५ वर्षांपासून बेकायदेशीर रित्या मुंबई आणि जवळपासच्या शहरात वास्तव्यास होते.पोलिसांनी अटक केलेल्या घुसखोर बांगलादेशीना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारतात बेकायदेशीर प्रवेशासाठी जबाबदार असलेल्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. (Bangladeshi infiltration)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community