Bangladeshi Infiltrators ची माहिती द्या, १,१११ रुपयांचे बक्षीस मिळवा; ‘या’ शहरात लागले बॅनर

347
Bangladeshi Infiltrators ची माहिती द्या, १,१११ रुपयांचे बक्षीस मिळवा; 'या' शहरात लागले बॅनर
  • प्रतिनिधी 

बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) पकडण्यासाठी पोलिसांची एकीकडे तीव्र कारवाई सुरू असताना, दुसरीकडे एका माजी नगरसेवकाने बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. शहरात तसे बॅनर देखील झळकावण्यात आले होते. मात्र शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून हे बॅनर काढण्यात आले आहे.

(हेही वाचा – Election Commission : कोण होणार मुख्य निवडणूक आयुक्त?)

राज्यभरात बांगलादेशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली असून, हे बांगलादेशी राज्यातील निवडणुकांमध्ये मतदान करतात, तसेच सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर राज्य शासनाने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून घुसखोर बांगलादेशींवर (Bangladeshi Infiltrators) कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाई तीव्र करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे शिवसेना शहर प्रमुख तसेच माजी नगरसेवक असलेले राजेंद्र सिंह भुल्लर महाराज यांनी उल्हासनगर शहरात बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्याला १,१११ बक्षिस देण्यात येणार असल्याचे बॅनर लावण्यात आले आहे.

(हेही वाचा – Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका)

“आपल्या सभोवताली असणाऱ्या व आपल्या भारत मातेच्या अखंडतेला धोका पोहोचवणाऱ्या फक्त १ बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या व मिळवा १,१११ रू. उल्हासनगरमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी पासून आपल्या शहराला धोका आहे तरी आपण एक देश प्रेमी व सुजाण नागरिक म्हणून आपल्या परिसरात जर बांगलादेशी रहिवाशी अवैधरित्या राहत असतील तर त्याची तत्काळ माहिती आम्हाला किवा जवळच्या पोलीस ठाण्याला द्या” असा मजकूर लिहून शहरभर बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. पोलिसांनी मात्र कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राजेंद्र सिंह भुल्लर महाराज यांना नोटीस पाठवून बॅनर काढण्याची ताकीद दिली आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी उल्हासनगरमधून १२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Infiltrators) अटक केल्याची चर्चा शहरात सुरू होताच भुल्लर यांनी बॅनरबाजी करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपी काही स्थानिक नेते आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.