शामुकतला पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भारतात बेकायदेशीरित्या घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली एका संशयित बांगलादेशीला अटक केली आहे.तसेच संशयिताला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators ) सात दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे भारतात आला होता. अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोराचे नाव बिलाल हुसेन आहे. तो बांगलादेशातील निलफामारी (Nilphamari) जिल्ह्यातील रहिवासी आहे.
( हेही वाचा : Haryana : एसी कॉम्प्रेसरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, एक जखमी)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूतान (Bhutan) सीमेवरील रहिमाबाद (Rahimabad) परिसरात बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators ) पोलिसांना फिरताना दिसला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी त्या व्यक्तीने प्रथम आपले नाव सैदुल इस्लाम असे सांगितले. त्याने सांगितले की तो जलपाईगुडी जिल्ह्यातील मेटलीचा रहिवासी आहे. चौकशीदरम्यान त्याने मेखलीगंजमध्ये घर असल्याचा दावाही केला. मात्र तो वारंवार जबाब बदलत होता, त्यामुळे शामुकतला पोलिस ठाण्याच्या पोलिसांना संशय आला. दरम्यान आरोपीने स्वत:ला भारतीय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र आढळले नाही. पोलिसांसमोर संशयिताने कबूल केले की त्याचे खरे नाव बिलाल हुसैन आहे. तो बांगलादेशातील निलफामारी (Nilphamari) जिल्ह्यातील रहिवासी आहे. सात दिवसांपूर्वी तो एका एजंटच्या मदतीने रात्रीच्या अंधारात बांगलादेश सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतात आला.
दरम्यान, अटक केलेल्या व्यक्तीने अवामी लीगशी (Awami League) संबंधित असल्याचा दावा केला आहे. बीएनपीच्या अत्याचारांपासून आपला जीव वाचवण्यासाठी तो या देशात आला होता, असेही त्याचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, तो त्याचे खरे नाव लपवण्याचे कारण किंवा रहिमाबाद (Rahimabad) परिसरात येण्याचा उद्देश स्पष्ट करू शकला नाही. त्याने सांगितले की तो एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी आला होता. पण त्याने घराचे नाव किंवा पत्ता सांगितला नाही. अशा परिस्थितीत बांगलादेशी घुसखोरांवर (Bangladeshi Infiltrators ) संशय वाढत चालला आहे. अटक केलेल्या बांगलादेशीला दि. २२ मार्चला अलीपूरद्वार (Alipurduar) न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या संदर्भात अलीपुरद्वारचे पोलिस अधीक्षक वाय रघुवंशी (Y Raghuvanshi) म्हणाले की, एका बांगलादेशी नागरिकाला (Bangladeshi Infiltrators ) संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्याला चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community