Bangladeshi Infiltrators : जुहूमधून ४ बांगलादेशींना अटक; देशाच्या राष्ट्रगीताने केली पोलखोल

Bangladeshi Infiltrators : पोलिसांनी सर्वांना राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितले. आरोपींना राष्ट्रगीत गाता येत नसताना पोलिसांनी त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. चौकशी आणि तपासादरम्यान चौघांकडे कोणतेही भारतीय कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले.

63
Bangladeshi Infiltrators : जुहूमधून ४ बांगलादेशींना अटक; देशाच्या राष्ट्रगीताने केली पोलखोल
Bangladeshi Infiltrators : जुहूमधून ४ बांगलादेशींना अटक; देशाच्या राष्ट्रगीताने केली पोलखोल

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळालेल्या माहितीनुसार जुहूमध्ये गुन्हे शाखेने बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये एक महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. काही बांगलादेशी नागरिक (Bangladeshi Infiltrators) जुहू परिसरात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजन करून तातडीने कारवाई सुरू केली.

पोप्पी टिटू हुसैन (वय ३० वर्षे, महिला), मोहम्मद तट्टू सोफिउद्दीन हुसैन (वय २५ वर्षे), नूर इस्लाम मकबूल (वय ५५ वर्षे), फैसल बिकू मुल्ला शेख (वय ३१ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या चौघांविरुद्ध जुहू पोलिस ठाण्यात (Juhu Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

(हेही वाचा – Jagtik Marathi Sammelan : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी शाळांची संख्या घटली; जागतिक मराठी संमेलनातील सूर)

पोलिसांनी जुहू परिसरात सापळा रचून बांगलादेशी नागरिकांना अटक केली. सर्व आवश्यक नियमांचे पालन करून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. या वेळी आरोपींनी आपण भारताचे नागरिक असल्याचा दावा केला. मात्र, त्यांचा दावा हा खोटा असल्याचे पुढील काही मिनिटांतच सिद्ध झाले. पोलिसांनी सर्वांना राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितले. आरोपींना राष्ट्रगीत गाता येत नसताना पोलिसांनी त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. चौकशी आणि तपासादरम्यान चौघांकडे कोणतेही भारतीय कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

देशभरात अवैध बांगलादेशींवर (Illegal Bangladeshis) कारवाई सुरू आहे, तसेच गेल्या १५ दिवसांत मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, देवनार, चुनाभट्टी आणि घाटकोपर या मुस्लिमबहुल भागातून मुंबई पोलिसांनी ३६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. अशातच आता गुन्हे शाखेच्या युनिट नऊने जुहू परिसरातून ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बेकायदेशीर बांगलादेशींवर राज्य पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक (Anti Terrorism Squad) कारवाई करत आहेत. गेल्या एका महिन्यात अशा २०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या आधारे वर्षानुवर्षे मुंबई आणि महाराष्ट्रात अन्यत्र रहात होते. त्यांच्याकडून बनावट आधार, रेशन कार्ड, भारतीय पासपोर्ट, बँक खाते, फोटोपास, पॅन कार्ड, विवाह प्रमाणपत्रही जप्त करण्यात आले आहे. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.