आसाम (Assam) आणि त्रिपुरामध्ये (Tripura) एकूण ८ बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) सुरक्षा रक्षकांनी अटक करण्यात आली आहे. तसेच त्रिपुरामध्ये घुसखोरांसोबत एका दलालाही अटक करण्यात आले आहे. या घुसखोरांना रेल्वे स्थानकाजवळ अटक करण्यात आली असून ते तेलियामुडा रेल्वे स्थानकावरून दुसरीकडे जाण्याचा ते प्रयत्न करत होते, अशी माहिती समोर आली आहे. (Assam)
( हेही वाचा : Bangladesh तील हिंदूंवर अत्याचार सुरूच; बांगलादेशातील पोलिसांचा अहवाल जारी)
आसाममधील (Assam) आंतरराष्ट्रीय सीमेनजीक चार घुसखोरांना अटक करण्यात आले असून मुहम्मद सुलेमन, मुहम्मद यासीन, फतिमा खातून आणि सुरा खातून अशी घुसखोरांची नावे आहेत. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश होता. या अटक झालेल्या बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवण्यात येणार आहे. दरम्यान सुरक्षा यंत्रणांना या घुसखोरांचा माहिती मिळताच त्यांच्या मुसख्या आवळल्या असून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. (Assam)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community