मालेगाव (Malegaon) जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी मध्यांतरी तीन जणांना अटक करण्यात आली. तहसीलदारांनी कोणताही आदेश दिलेला नसताना तसेच मनपाने जन्मदाखला दिला नसतानाही काही जणांकडे जन्मदाखला असल्याचे आढळून आले आहे. अशा १० जणांवर मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. (Bangladeshi infiltrators)
( हेही वाचा : Sam Pitroda यांच्या विरोधात गुन्हा दाखल)
दरम्यान मालेगाव (Malegaon) बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने अर्जदाराचे वकील खालिद अन्सारी (Khalid Ansari) आणि बालेकिल्ला वृत्तपत्र संपादक निवृत्ती बागुल (nivrutti bagul) यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत, अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दि. १० मार्च रोजी ‘एक्स’ अकाऊंटवर दिली आहे.
बोगस जन्म प्रमाणपत्र; ८७ जणांना नोटीस
तसेच माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात (Sillod Police Station) तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिली गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याप्रकरणी सिल्लोड नगरपरिषदेने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रांची फेर पडताळणी सुरु आहे. नगरपरिषद कार्यालयाने ८७ नागरिकांना कागदरपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. त्याआधी संशयित कागदपत्रे आढळलेल्या तीन जणांविरोधात दोन आठवड्यांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community