Bangladeshi infiltrators एक हजार रुपयांत सीमेवरून भारतात ‘एन्ट्री’

164
Bangladeshi infiltrators : बांगलादेशातील बेरोजगारी, उपासमारीला कंटाळून भारतात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई वाढलेली आहे. त्यातही मागील तीन वर्षात हजारहून अधिक जणांवर अटकेची कारवाई झाली असून, त्या तुलनेत या घुसखोरांना मायदेशी पाठवण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. अवघ्या हजार ते दोन हजार रुपयांत ही मंडळी नागरिकत्वाची (Citizenship) भारतीय कागदपत्रे मिळवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.  (Bangladeshi infiltrators)

(हेही वाचा – Share Investors : महाराष्ट्राचा ‘एनएसई’वर दबदबा; आयपीओ, गुंतवणूकदारांच्या संख्येत आघाडी

बांगलादेशातून अवैध मार्गाने सीमारेषा (boundary line) ओलांडून भारतात येणारे घुसखोर बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पॅनकार्ड तयार करून भारतात राहतात. या घुसखोरांना आवश्यक कागदपत्रे बनवून देण्यात अनेकदा भारतीय नागरिकच मदत करतात. 
१,१७३ जणांना अटक
शिवाय हे घुसखोर झोपडपट्टी परिसरात राहात असल्याने त्यांची ओळख पटणे लवकर शक्य होत नाही. तरीही मुंबईतील (Mumbai) सर्व पोलीस ठाणी व गुन्हे शाखा, तसेच एटीएस व एनआयएमार्फत नियमितपणे बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात येते. गेल्या तीन वर्षांत १ हजार १७३ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर २५९ घुसखोरांना परत त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक अटकेची कारवाई २०२५ वर्षात करण्यात आली आहे.
७ वर्षांत ८५ बांगलादेशींनी बनवले बनावट पासपोर्ट
राज्य दहशतवादविरोधी पथकाने यापूर्वी केलेल्या कारवाईत अटक केलेला आरोपी रफीक शेखने ७ वर्षांत ८५ बांगलादेशी नागरिकांना बनावट पारपत्र (Passport) तयार करून दिल्याचे सांगितले होते. तसेच शेख हा स्वतः साक्षीदार राहून अर्जदारासाठी बनावट २ भाडेकरार, शपथपत्र, पॅनकार्ड तयार करून घेत असे. त्यानंतर अर्जदाराच्या पॅनकार्डच्या आधारे आधारकार्ड तयार करून घेत असे. पुढे शाळा सोडल्याचा, ३ जन्मतारखेचा बनावट दाखला तयार करून सर्व कागदपत्रांच्या आधारे पारपत्रही मिळवण्यासाठी तो पाठपुरावा करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

(हेही वाचा – यशवंतराव चव्हाण ग्रंथ निर्मिती आणि अनुवाद मंडळ स्थापन करणार; मंत्री Uday Samant यांची घोषणा )

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांवर पोलीस कारवाई सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले होते. तसेच ‘सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. असे सर्व बांगलादेशी नागरिक जे बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत. त्यांना शोधून हद्दपार करण्याची सरकारची भूमिका असून आम्ही हे काम सुरूही केले आहे. त्याच धर्तीवर मुंबई, नवी मुंबई, धुळे, भिवंडी आणि राज्यातील इतर भागात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची (Bangladeshi) ओळख पटवण्यासाठी राज्य पोलीस विशेष मोहीम राबवत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.