नालासोपारा (Nallasopara) आणि उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी १५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये नालासोपाऱ्यातील (Nallasopara) सर्वाधिक १३ बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) आणि उल्हासनगरमध्ये पती-पत्नी बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे वसई-विरार भागात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
( हेही वाचा : Expensive Car : मुंबईकरांनी सरत्या वर्षात केला महागड्या कारचा विक्रम; 1400 वाहनांची नोंदणी)
घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी दि. ५ जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने अहमद मिया शेख आणि बांगलादेशी नागरिकाला महिनाभरापूर्वी अटक केली होती. या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. ४ जानेवारीच्या रात्री नालासोपारा (Nallasopara) येथील आचोळे परिसरात छापा टाकून १३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यात तैबुर अजगर शेख, आलम अजगर शेख, मिझानू सलाम शेख, अब्दुल सिराज शेख, मुराद मिजानूर शेख, रत्ना तैबुर शेख, अमिना मुराद शेख, सबिना अब्दुल्ला शेख, कोहिनूर मिजानूर शेख आणि अन्य चार जणांचा समावेश आहे. हे सर्वजण सेनालासोपारा येथे अवैधरित्या राहत होते. या सर्वांची चौकशी केल्यानंतर आणखी बांगलादेशी नागरिक पकडले जाण्याची शक्यता आहे.
तसेच उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिसांनी न्यू साईबाबा कॉलनीत छापा टाकून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. मीना मुजीद खान (३०) आणि महमूद खान असद खान (२७) अशी या दोघांची नावे असून दोघेही पती-पत्नी आहेत. त्यापैकी मीना हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायची, तर महमूद रस्त्यावर सामान विकायचा. या दोन्ही प्रकरणांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community