राजस्थानमधील (Rajasthan) अजमेर (Ajmer) येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi infiltrators) ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. एसपी वंदिता राणा (Vandita Rana) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली असून पथकाने दर्गा परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi infiltrators) शोधमोहिम राबवली. या मोहिमेत २५ ते ३० बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. (Bangladeshi infiltrators)
( हेही वाचा : आधी गोळीबार, नंतर सुटका; भारताने आक्षेप घेताच Sri Lanka ने केली 6 मासेमारांची सुटका)
याप्रकरणी पोलीस म्हणाले की, दर्ग्यांच्या परिसरात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यासाठी विशेष पथक राबवण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून काही सूत्रधारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कब्रीस्तान, आंदकोट, न्यू रोड आणि इतर परिसरामध्ये सुमारे २५-३० घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. तसेच दर्ग्यांच्या काही भागातील नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे. (Bangladeshi infiltrators)
दरम्यान दर्गा पोलिसांनी (Dargah Police) सांगितले की, दोन अज्ञातांनी सीमा ओलांडून अवैधपणे भारतात प्रवेश केला. त्यानंतर ते भारतात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होते. दोघांची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी ते बांगलादेशी असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. (Bangladeshi infiltrators)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community