गेल्या काही दिवसांपासून घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील कोपरी पोलिसांनी संशयित बांगलादेशी मजुरांची ओळख परेड सुरु केली आहे. यात हॉटेल, बांधकाम, फेरीवाले आदी एकूण १५ आस्थापनांत शोध मोहीम घेऊन तब्बल २२५ संशयित व्यक्तींची ओळख परेड पूर्ण करण्यात आली. (Thane )
( हेही वाचा : Bomb Threat : भोपाळमधील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी; तेलगू भाषेत मुख्याध्यापिकेला पाठवला ईमेल)
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर तरुण हा बांगलादेशी (Bangladeshi) असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातील बांगलादेशी घुसखोरांची सक्रीयता पाहता पोलिसांना कडक कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. ठाण्यातही संशयास्पद परिसरात शोध मोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे (Ashutosh Dumbare) यांनी दिले आहेत. त्यानुसार कोपरी पोलिसांनी ठाणे (Thane ) पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल, बांधकाम, फेरीवाल्यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवली आहे. (Thane ) (Bangladeshi infiltrators)
बेकायदेशीरपणे घुसखोरी करून बांगलादेशी नागरिक (Bangladeshi infiltrators) मोठ्या प्रमाणात भारतातील वेगवेगळ्या शहरात राहतात. त्यामुळे कोपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम परिसर, हॉटेल, फेरीवाले, फळभाज्या, मटण विक्रेते आदी ठिकाणी अचानक भेट देऊन बांगलादेशी नागरिकांची पोलिस तपासणी करत आहेत. आतापर्यंत १४ आस्थापने आणि इतर ठिकाणी २२५ नागरिकांची कागदपत्रे तपासली आहेत. तसेच बांगलादेशी घुसखोरांबाबत (Bangladeshi infiltrators) कोणाकडे माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. (Thane )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community