
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) महासमुंद पोलिसांनी चोरी करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) अटक केली आहे. तसेच एका मानवी तस्कर आणि सोनारालाही अटक करण्यात आली आहे. चोरट्यांच्या टोळीत बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators) ही असल्याची माहिती उघड झाली आहे. तर उर्वरित दोन आरोपी प. बंगालचे रहिवासी आहेत. आरोपीने महासमुंद जिल्ह्यात नऊ वेळा चोऱ्या केल्या होत्या. यासाठी त्याने १० वेळा बांगलादेश-भारत सीमा ओलांडली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ लाखांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने, ७ हजार रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त केली आहे. (Bangladeshi Infiltrators )
( हेही वाचा : आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा Virat Kohli ठरला एकमेव फलंदाज)
बांगलादेशी घुसखोरांच्या टोळीचा म्होरक्या मिलन मंडल (Milan Mandal) २००३ पासून छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) राहत होता. मिलन मंडलला २०२२ मध्ये चोरीच्या आरोपाखाली दोन वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा मिळाली होती. तसेच या आरोपीने २००३ पासून दहा वेळा बांगलादेशला भेट दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. (Bangladeshi Infiltrators)
अशा वेळी, राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency) दि. २१ मार्च रोजी छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) बंदी घातलेल्या अतिरेकी संघटना सीपीआयकडून (CPI) स्फोटकांच्या खरेदी आणि पुरवठ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक आलेल्यांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दहशतविरोधी संस्थेने दगदलपूरमधील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात, राज्यातील सुकमा जिल्ह्यातील पटनापासमधील रहिवासी असणाऱ्या सेला नागार्जुन (Sela Nagarjuna) आणि मंतोष मंडल यांची नावे देण्यात आली आहेत. (Bangladeshi Infiltrators)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी भांडी विकण्याच्या बहाण्याने घरांची रेकी करत होते. सीसीटीव्ही आणि खबऱ्यांची मदत घेऊन पोलिसांनी त्यांना सराईपलीतील एका लॉजवरून अटक केली. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध परदेशी नागरिक कायदा आणि चोरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community