बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi Infiltrators) संख्या मुंबईत (Mumbai) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक घटकांवरही भार पडत आहे. रोजगार व अन्य कारणांमुळे मुंबईत येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर पोलिस सातत्याने कारवाई करत आहेत. गेल्या तीन वर्षात एक हजाराहून अधिक बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. तसेच २५९ बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. त्यातच संबंधित बांगलादेशींना (Bangladeshi Infiltrators) भारतात राहण्यास मदत करणाऱ्या १२ भारतीयांनाही अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा : BJP चा राष्ट्रीय अध्यक्ष ६ एप्रिलला जाहीर होणार; ‘ही’ चार नावं चर्चेत)
गेल्या काही वर्षात बांगलादेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची घुसखोरांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक घुसखोर चोरी, दरोडे, अंमली पदार्थांची तस्करी आदी गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचेही यापूर्वी उघड झाले आहे. हे बांगलादेशी घुसखोर बनावट आधार कार्ड (Aadhaar) , पॅन कार्ड (PAN Card), रेशन कार्ड तयार करून बेकायदेशीररित्या भारतात राहत होते. या घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) आवश्यक कागदपत्रे बनवून देण्यात भारतीय नागरिकच मदत करत होते. (Bangladeshi Infiltrators)
मुंबईतील (Mumbai) सर्व पोलिस ठाणे व गुन्हे शाखा तसेच ए.टी.एस व एन.आय.ए (NIA) यांच्यामार्फत नियमितपणे घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षात १ हजार १७३ बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, २५९ घुसखोरांनी परत त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक अटक २०२५ वर्षात करण्यात आल्या आहेत. (Bangladeshi Infiltrators)
हेही पाहा :