Bangladeshi Infiltrators घेत होते पीएम-किसान योजनेचा लाभ; १८१ बोगस शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

63
Bangladeshi Infiltrators घेत होते पीएम-किसान योजनेचा लाभ; १८१ बोगस शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल
Bangladeshi Infiltrators घेत होते पीएम-किसान योजनेचा लाभ; १८१ बोगस शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

कळवण तालुक्यामध्ये बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators ) शेतकऱ्यांनी शेतकरी पीक विम्याचा (Crop insurance) लाभ घेतल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी पोलीस ठाण्यामध्ये 181 बोगस शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे चांगलीच खळब उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की नुकत्याच अलीकडच्या काळामध्ये भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कळवण (Kalvan) भागाचा दौरा करून या ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी या ठिकाणी बोगस शेतकरी असल्याचे बसवून शासनाच्या पंतप्रधान किसान विमा योजनेचा (Pradhan Mantri Fasal Bima Yojana ) लाभ घेतल्याची माहिती कृषी अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये दिली होती यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे.

( हेही वाचा : ST कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामात विशेष वाहतूक; लांब पल्ल्यासाठी दररोज ७६४ जादा फेऱ्या

मालेगाव मध्ये बांगलादेशी नागरिकांनी (Bangladeshi Infiltrators ) विरोधात किरीट सोमय्या यांचे आंदोलन सुरूच आहे आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणावरती आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. बाबत कळवणच्या तालुका कृषी अधिकारी मिलन म्हस्के (Milan Mhaske) यांनी कळवण पोलीस ठाण्यामध्ये भादवी 41/7 ,465/46 या कलमान्वये पंतप्रधान किसान विमा योजनेचा (Pradhan Mantri Fasal Bima Yojana ) सुमारे 181 शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शासनाची दोन कोटी 98 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी प्रत्यक्ष दर्शनी शेतकरी नसल्याचे समोर आल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पोलीस या प्रकरणी तपास करीत असून हे सर्व नागरिक हे बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators ) असल्याचे निदर्शनास प्रथमदर्शनी आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेंभेकर (Tembhekar) हे अधिक तपास करीत आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.