नोएडा पोलिसांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीच्या शाहीन बाग परिसरातून अटक केली आहे. आरोपीचे नाव शेख अताउल (Sheikh Ataul) (४०) असल्याची माहिती मिळाली आहे. तो बांगलादेशाचा मूळ निवासी आहे. परंतु तो पश्चिम बंगालच्या (West Bengal) मालदा जिल्ह्यात कुटुंबियांसह राहतो. त्यानंतर तो दिल्लीच्या शाहीन बाग (Shaheen Bagh) परिसरात राहण्यास आला. पोलिसांनी आरोपीकडून ए. ३१५ बोअर पिस्तुल, जिवंत काडतुस, एक चाकू आणि आक्षेपार्ह दस्ताऐवज, मोबाईल फोन जमा केले आहेत.
( हेही वाचा : गोहत्या थांबली नाही, तर कायदा हातात घ्यावा लागेल; विधानसभेत Nilesh Rane आक्रमक)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर ३९ मध्ये पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील आरोपी शेखच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला दिल्लीतून अटकही करण्यात आली. एडिशनल डीसीपी मनीष मिश्रा यांनी सांगितले की, शेखविरोधात भारतीय न्याय संहिता आणि आयटी अॅक्टसह अन्य कलमांखाली केस दाखल करण्यात आली आहे.
तपासादरम्यान शेखने (Sheikh Ataul) सांगितले की, हत्यार आपल्या सुरक्षा आणि धमकावण्यासाठी ठेवले आहेत. पोलिस आता त्याचा तपास करत असून शेख गुन्ह्यांच्या प्रकरणात आरोपी असल्याचे आणि मुख्यमंत्री योगी (CM Yogi Adityanath)यांच्यावर हल्ला करण्याची योजना बनवत असल्याचे आढळले. एडिशनल डीसीपी मनीष मिश्रा म्हणाले की, व्हायरल व्हिडीओतील आरोपी संविधानिक पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात खोटी आणि वादग्रस्त विधान करत आहे. ज्यामुळे धार्मिक हिंसेला खतपाणी घातले जात आहे. तसेच आरोपीने धार्मिक विधान करून अनेक लोकांच्या धार्मिक भावनेला ठेच पोहचवली आहे.
व्हायरल व्हिडिओत शेख अताउल (Sheikh Ataul) म्हणतो की, योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath)यांची कुर्बानी देईन. तसेच व्हिडिओत त्याने धार्मिक हिंसेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने उघडपणे मांस खाण्याचे आणि मशिदी पाडून धार्मिक उन्माद पसरवण्याचे खोटे आरोप केले आहेत. त्याने सांगितले, बिस्मिल्लाह बोलीन आणि कुर्बानी देईन. हे बोलत त्याने कुर्बानी देण्याचा ही इशारा केला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community