स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी मुसलमानांची लोकसंख्या ८ टक्के होती, जी आता २२ टक्के झाली आहे. १९७० मध्ये दीड ते २ कोटी बांगलादेशी घुसखोर मुसलमान भारतात आले होते. आता ते १० कोटी झाले आहेत. असे दिसते की, आज केंद्रासह बहुतांश ठिकाणी हिंदुत्वाची सरकारे आहेत, परंतु अधिक जागा आहेत जिथे विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचे अंतर कमी आहे. जिथे हे मतांचे अंतर कमी आहे, त्या भागात या बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना वसवले जात आहे. जेणेकरून त्यांचे उमेदवार भविष्यात जिंकू शकतील. जर असे झाले, तर ही हिंदुत्वनिष्ठ सरकारे आगामी काळातील शेवटची सरकारे सिद्ध होतील, असा धोक्याचा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) नातू आणि दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी दिला.
(हेही वाचा – दिशा सालियन प्रकरणावर Uddhav Thackeray पत्रकार परिषदेत काय म्हणाले ?)
सोमवार, २४ मार्च या दिवशी मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या हस्ते इंदूर (Indore) येथे भारताचे महान सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या अनावरण सोहळ्यात रणजित सावरकर यांनी हे उद्गार काढले. मध्यप्रदेश सरकारच्या वतीने प्रगतीनगर परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा उभारण्यात आला आहे. या वेळी माजी खासदार मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, बिहारचे आमदार अजित शर्मा, माजी आमदार चरणसिंह सपरा, युसूफ अब्राहमी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, सरचिटणीस भूषण पाटील आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते. या अनावरण सोहळ्याला सावरकरप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
बांगलादेशी घुसखोर मुसलमानांची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे. त्यामुळे ते संकटात सापडतील आणि देश सोडून निघून जातील, असे आवाहन रणजित सावरकर यांनी या वेळी केले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर बनवलेला चित्रपट मध्यप्रदेशातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात दाखवावा, जेणेकरून तरुण पिढीला त्यांचे विचार आणि त्याग यातून प्रेरणा घेता येईल, अशी विनंती मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे केली.
आज इंदौर की पुण्यभूमि पर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी की प्रतिमा का लोकार्पण कर विनम्र श्रद्धांजलि अर्पित की।
श्रद्धेय वीर सावरकर जी का संपूर्ण जीवन राष्ट्रभक्ति, साहस और त्याग का जीवंत प्रतीक है। उन्होंने अपने तप, संघर्ष और अटूट संकल्प के साथ मां भारती की सेवा करते… pic.twitter.com/TX0nVWSb6w
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) March 24, 2025
वीर सावरकरांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवणार – मुख्यमंत्री
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारताचे महान क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसुधारक, इतिहासकार, कवी, वक्ते आणि दूरदर्शी राजकारणी होते. त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्यामुळे ते वीर सावरकर म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि सर्जनशीलता लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. सावरकरांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचे पालन केले असते, तर देशातील आजची परिस्थिती वेगळी असती. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. (Ranjit Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community