
अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्यांना (Bangladeshi Rohingya) आश्रय दिला जातो, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde ) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे अमरावतीत आश्रयित असलेल्या बांगलादेशीना शोधून काढण्याचे एक मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. अमरावती म्हणजे प्रयोगशाळा करून टाकली आहे. मागे ज्यावेळी दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी इथे बांगलादेशी यांना आश्रय दिला जात असल्याचा देखील स्पष्ट केलं होतं. पोलीस आयुक्तांना या संदर्भात पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती डॉ.बोंडे (Anil Bonde ) यांनी दिली आहे.
( हेही वाचा : Delhi Assembly Election च्या प्रचारासाठी दरपत्रक; ४० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची मर्यादा)
अमरावतीत आश्रयित असलेले बांगलादेशी रोहिंग्या (Bangladeshi Rohingya) की पश्चिम बंगालचे (West Bengal)
रहिवासी याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्याच प्रकरण बाहेर काढलं. त्यावेळी सर्वजण जागरूक झाले आहेत. औद्योगिक वसाहतीत बांगला बोलणारे नागरिक आहेत. त्यामधील अनेक जणांची कागदपत्र ही संशयास्पद आहेत. ते बांगलादेशातून आले असल्याचे महाराष्ट्रात आता जाहीर झालं आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर हल्ला करणारा देखील बांगलादेशी आहे. त्यामुळे या बांगलादेशीवर कडक कारवाई करण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे असे देखील बोंडे (Anil Bonde ) यांनी स्पष्ट केले आहे. (Anil Bonde )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community