बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये (Murshidabad) वक्फ सुधारणा कायद्यावरून गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या हिंदुविरोधी हिंसाचाराच्या मागे बांगलादेशाचा संबंध असल्याचे समोर येत आहे. वक्फ कायद्याला विरोध करण्याच्या बहाण्याने जिहादी आतंकवाद्यांनी रचलेल्या कटाचा भाग म्हणून मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार (Murshidabad Violence) केला जात असल्याचे समोर आले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २ हिंदूंसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामागे बांगलादेशातील (Bangladesh) जिहादी आतंकवादी संघटना ‘हिज्बुत-उत-तहरीर’ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
(हेही वाचा – Conversion : ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या ६ कुटुंबांना गावकऱ्यांनी दिले हाकलून)
गुप्तचर संस्थांना अशी माहिती मिळाली आहे की, हिज्बुत-उत-तहरीरचे प्रमुख कमांडर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुर्शिदाबादला आले होते. हिज्बुत-उत-तहरीरचे २ म्होरके गेल्या काही महिन्यांपासून मुर्शिदाबादमधील धुलियान आणि फरक्का येथे सक्रीय होते. येथे हिज्बुत-उत-तहरीरचे (Hizbut ut-Tahrir) ४० हून अधिक ‘स्लीपर सेल’ असू शकतात. मुर्शिदाबादची सीमा बांगलादेशाला लागून आहे. येथून घुसखोरी आणि तस्करी होत असल्याचे सांगितले जाते. ‘हिज्बुत’ मुर्शिदाबादमध्ये तिचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
बांगलादेशी आतंकवादी (Bangladeshi terrorists) संघटना ‘अन्सारुल्ला बांगला टीम’च्या (Ansarullah Bangla Team) आतंकवाद्यांना मुर्शिदाबादमधील धुलियान येथून अटक करण्यात आली होती. या भागात ‘अल् कायदा इन इंडियन सबकॉन्टिनंट’ आणि ‘हिजबुल मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनांच्या कारवायादेखील उघडकीस आल्या आहेत. बांगलादेशात गेल्या वर्षी झालेल्या सत्तापालटाच्या वेळेच्या हिंसाचाराच्या वेळी याच संघटनेने हिंदूंना घराबाहेर ओढून रस्त्यावर मारहाण केली होती.
बंगाल आतंकवाद्यांचे लाँचिंग पॅड
गेल्या २ वर्षांत ‘अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनंट’ आणि ‘अन्सारुल्ला बांगला टीम’शी संबंधित अनेक आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी २० आतंकवादी बांगलादेशी आहेत. सूत्रांचा दावा आहे की, बांगलादेश सीमेजवळ अनेक तथाकथित मदरसे आहेत, जिथे धर्माच्या नावाखाली तरुणांचा बुद्धीभेद केला जात आहे. त्यांना शस्त्रे वापरण्याचे आणि स्फोटके बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षित जिहादींना बनावट भारतीय ओळखपत्रे दिली जातात आणि बंगालचे बांगलादेशामध्ये रूपांतर करण्यासाठी भारतात पाठवले जाते. (Murshidabad)
हेही पहा –