डिसेंबर महिना संपायला फक्त काही दिवस बाकी राहिले आहेत. आता लवकरच २०२३ हे नववर्ष सुरू होणार आहे. पण नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातचं तब्बल ११ दिवस बॅंक बंद राहणार आहेत. बॅंकेला सुट्ट्या असल्या की, नागरिकांता खोळंबा होतो त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून आधीच सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे बॅंकेशी संबंधित कामे वेळेत करा…
( हेही वाचा : सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा)
जानेवारी २०२३ मधील बॅंकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
- १ जानेवारी – रविवार
- २ जानेवारी – ( नववर्षाच्या उत्सवानिमित्त बॅंका बंद राहतील)
- ३ जानेवारी – सोमवार ( इंफाळमध्ये बॅंका बंद राहतील)
- ४ जानेवारी – मंगलवार (इंफाळमध्ये बॅंका बंद राहतील)
- ८ जानेवारी – रविवार
- १४ जानेवारी – मकर संक्रांती ( दुसरा शनिवार)
- १५ जानेवारी – पोंगल/माघ बिहू/ रविवार
- २२ जानेवारी – रविवार
- २६ जानेवारी – गुरूवार ( प्रजासत्ताक दिनानिमित्त बॅंका बंद राहतील)
- २८ जानेवारी – चौथा शनिवार
- २९ जानेवारी – रविवार
बॅंका बंद असताना आवश्यक कामे कशी कराल?
तुम्हाला बॅंका बंद असताना आवश्यक कामे करायची असल्यास किंवा पैसे ट्रान्सफर करायचे असल्यात तुम्ही नेट बॅंकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही एटीएम वापरू शकता. यासोबत तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड आणि UPI द्वारे ऑनलाईन पेमेंट करू शकता.
Join Our WhatsApp Community