येत्या काही दिवसात एप्रिल महिना सुरू होणार आहे. नवं आर्थिक वर्ष देखील १ एप्रिलपासून सुरू होणार असून मार्च महिन्यासारखेच या महिन्यातही बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे जर तुमची बँकाची कामं शिल्लक असतील तर ती लवकरात लवकर उरकून घ्या…किंवा एप्रिल महिन्यात बँकेत अचानक कामं निघल्यास सुट्यांची यादी तपासून आपल्या बँकेत जा.
रिझर्व्ह बँकेकडून सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरातील बँकांना कोणत्या महिन्यात किती सुट्या आहे, याची एक यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीनुसार या महिन्यात देशभरातील बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र या यादीत अशा देखील काही सुट्या असतात. ज्या सुट्या फक्त त्या-त्या प्रदेशासाठीच मर्यादीत असतात.
(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर काय आहेत आरोप? )
बघा बँकांच्या सुट्ट्यांची यादी
- १ एप्रिल – वार्षिक क्लोजिंग दिवस. या दिवशी देशाभरातील जवळपास सर्वच बँका बंद राहतात
- २ एप्रिल – शनिवार, गुढीपाडवा
- ३ एप्रिल – रविवार
- ४ एप्रिल – सरहुलसाठी रांची आणि झारखंडमधील बँकांना सुटी
- ५ एप्रिल – बाबू जगजीवन राम यांची जंयती आहे. तेलंगना आणि हैदराबादमधील बँकाना सुटी
- ९ एप्रिल – महिन्याचा दुसरा शनिवार
- १० एप्रिल – रविवार
- १४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
- १५ एप्रिल – गुड फ्राइडे, बंगाली नववर्ष आणि हिमाचल दिवस
- १७ एप्रिल – रविवार
- २१ एप्रिल – गडिया पूजा, अगरताळा आणि आसपासच्या प्रदेशात असतो त्यामुळे त्या दिवशी तिथे बँका बंद
- २३ एप्रिल –चौथा शनिवार
- २४ एप्रिल – रविवार
- २९ एप्रिल- शब ई कद्र, जुमात उल विदाच्या निमित्ताने बँक बंद