Bank Holidays in July : जुलै महिन्यात १२ दिवस बँका बंद

Bank Holidays in July : जुलै महिन्यात बँका कधी बंद असतील जाणून घेऊया.

560
Bank Holidays in July : जुलै महिन्यात १२ दिवस बँका बंद
  • ऋजुता लुकतुके

जुलै महिन्याचं आर्थिक नियोजन करताना बँकांना असलेल्या सुट्ट्याही विचारात घेणं महत्त्वाचं आहे. रिझर्व्ह बँक प्रत्येक महिन्याच्या बँका आणि वित्तीय संस्थांना असलेल्या सुट्ट्या काही दिवस आधी जाहीर करत असते. काही सुट्ट्या या देशपातळीवर समान असतात. तर काही सुट्ट्या फक्त ठराविक राज्यांना लागू होतात. (Bank Holidays in July)

जुलै महिन्यांत बँकांना एकूण १२ दिवस सुट्टी आहे. हा महिना हा तसा सणांचा महिना नाही. पण, इथून पुढे ऑगस्ट आणि सप्टेंबरला सुट्ट्या सुरू होतील. सुट्टीच्या दिवशी बँकेच्या शाखा तर बंद असतीलच शिवाय आर्थिक व्यवहारांची कुठलीही प्रक्रिया तेव्हा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे सेटलमेंट, व्यवहारांची पूर्तता अशी कामंही होत नाहीत. जुलै महिन्यातील देशभरातील सुट्ट्या जाणून घेऊया, (Bank Holidays in July)

जुलै महिन्यात फार मोठे सण नाहीत. पण या महिन्यात एकूण १२ दिवस बँका बंद असतील. या महिन्यात एकूण चार रविवार तर दोन शनिवार (दुसरा आणि चौथा शनिवार) यासह विविध सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहा दिवस बँका बंद असतील. भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक भागात साजरे केले जाणारे सण आणि उत्सव हे वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक भागात वेगवेगळ्या दिवशी बँका बंद आहेत. १७ जुलै रोजी मोहर्रम आहे. त्यामुळे या दिवशी देशाच्या बहुसंख्य भागांत बँका बंद असतील. (Bank Holidays in July)

(हेही वाचा – दावोस सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार; Uday Samant यांची घोषणा)

बँकांचे सुट्ट्यांचे दिवस

३ जुलै – बेहदीन खलम – (शिलाँग)
६ जुलै – एमएचआयपी डे – (एजोल)
७ जुलै – रविवार – (सर्व ठिकाणी)
८ जुलै – कांग रतयात्रा – (इम्फाळ)
९ जुलै – दुप्का त्से-जी – (गंगटोक)
१३ जुलै – दुसरा शनिवार – (सर्व टिकाणी)
१४ जुलै – रविवार – (सर्व ठिकाणी)
१६ जुलै – हरेला – (देहरादून)
१७ जुलै – मोहर्रम – (बहुसंख्य ठिकाणी)
२१ जुलै – रविवार – (सर्व ठिकाणी)
२७ जुलै – चौथा शनिवार – (सर्व ठिकाणी)
२८ जुलै – रविवार – सर्व ठिकाणी

दरम्यान, या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्हाला बँकेच्या कामाचे नियोजन आखावे लागेल. जुलै महिन्यात एकूण १२ दिवस बँका बंद असल्या तरी या काळात ऑनलाईन बँकिंग चालूच राहणार आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईल आणि इंटरनेट बँकेच्या पैशांचे व्यवहार करता येतील. एटीएमच्या माध्यमातूनही तुम्हाला या तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता येतील. (Bank Holidays in July)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.