ऑक्टोबर महिन्यांमध्ये सुट्ट्यांची देखील दिवाळी होती. बँक कर्मचा-यांसह कर्मचा-यांना ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या होत्या. पण आता नोव्हेंबर महिन्यात कॅलेंडरमध्ये लाल तारखांचा दुष्काळ पडणार आहे. आरबीआयने बँक कर्मचा-यांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून या महिन्यात बँक कर्मचा-यांना केवळ गुरुनानक जयंतीच्या सुट्टीसह आठवड्याला मिळणा-या सुट्ट्यांवरच समाधान मानावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
केवळ 7 दिवस राहणार बँका बंद
ऑक्टोबर महिन्यात दिवाळी,दसरा या सणांमुळे बँक कर्मचा-यांची चांगलीच चंगळ झाली होती. पण आता नोव्हेंबरमध्ये बँक कर्मचा-यांना रग्गड काम करावे लागणार आहे. 30 दिवसांच्या या महिन्यात महाराष्ट्रात शनिवार आणि रविवार मिळून गुरुनानक जयंतीची सुट्टी धरुन केवळ 7 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.
(हेही वाचाः बाबाच्या उपचाराने तो तिरडीवर उठून बसला? अकोल्यात पोलिसांनी उघड केला अंधश्रद्धेचा प्रकार)
आरबीआयने दिलेल्या बँक हॉलिडेच्या यादीनुसार नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात 1,8,11 आणि 13 नोव्हेंबरला बँका बंद राहणार आहेत. पण यापैकी महाराष्ट्रात केवळ 8 नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.
अशा आहेत सुट्ट्या
- 6 नोव्हेंबर- रविवार(साप्ताहिक सुट्टी)
- 8 नोव्हेंबर- गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी
- 12 नोव्हेंबर- दुसरा शनिवार(साप्ताहिक सुट्टी)
- 13 नोव्हेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 20 नोव्हेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 26 नोव्हेंबर- चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
- 27 नोव्हेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून संपूर्ण वर्षभरातील बँक हॉलिडेचे वेळापत्रक देण्यात येते. त्यानुसार ही माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community