- ऋजुता लुकतुके
ऑगस्टपासूनच देशभरात सणांचा माहोल सुरू झाला आहे. गोपाळकाला आणि कृष्ण जन्माष्टमीसह पुढील महिन्यात गणपतींचं आगमनही घरोघरी होणार आहे. काही सणांच्या दिवशी तर बँकांनाही जाहीर सुट्टी असेल. त्यामुळ बँकांच्या कामांचं काटेकोर नियोजन सप्टेंबर महिन्यात करावं लागणार आहे. या महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या पाहूया,
रिझर्व्ह बँक वेळोवेळी सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. सप्टेंबर महिन्यातील सण उत्सव, शनिवार आणि रविवार असे मिळून एकूण ८ दिवस बंका बंद राहणार आहेत. या दिवशी सार्वजनिक कार्यालयं आणि खासगी कार्यालयांना देखील सुट्ट्या असू शकतात. काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांमुळे इतर दिवशीही बँका बंद राहू शकतात. आपण महाराष्ट्रातील सुट्ट्यांची यादी पाहूया (Bank Holidays in September)
(हेही वाचा – World Test Championship : इंग्लंड, बांगलादेशच्या विजयामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठे बदल)
१ सप्टेंबर २०२४ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
७ सप्टेंबर २०२४ : गणेश चतुर्थी (काही राज्यांमध्ये सुट्टी)
८ सप्टेंबर २०२४ : रविवार (साप्ताहिक सुट्टी )
१४ सप्टेंबर २०२४ : दुसरा शनिवार
१५ सप्टेंबर २०२४ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१६ सप्टेंबर २०२४ : ईद-ए- मिलाद (काही राज्यांमध्ये सुट्टी)
२२ सप्टेंबर २०२४ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२८ सप्टेंबर २०२४ : चौथा शनिवार
२९ सप्टेंबर २०२४ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
(हेही वाचा – Shikhar Dhawan : निवृत्तीनंतर शिखर धवन कोणत्या नवीन इनिंगच्या तयारीत?)
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवासारखा प्रमुख सण साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव काळात बँका किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. गणेशोत्सव ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून सुरु होणार आहे. त्या दिवशी बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी ८ सप्टेंबरला असेल. त्यामुळं बँका सलग दोन दिवस बंद राहतील. पुढच्या आठवड्यात दुसरा शनिवार १४ सप्टेंबर रोजी आहे, साप्ताहिक सुट्टी म्हणजेच रविवारी १५ सप्टेंबरला आणि १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. म्हणजेत सलग तीन दिवस बँका बंद राहतील.
महाराष्ट्रात वर नमूद केल्या प्रमाणे आठही दिवस बँका बंद असणार आहेत. चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यासह गणेश चतुर्थी आणि ईद-ए- मिलादची सुट्टी असेल. (Bank Holidays in September)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community