Bank Lockers : भारतात पुरेसे बँक लॉकर नसल्याचा ऑरमचा अहवाल 

मागणी आणि प्रत्यक्ष उपलब्ध लॉकर यांत ४५ दशलक्ष लॉकरची तफावत असल्याचं हा अहवाल सांगतो. 

165
Bank Lockers : भारतात पुरेसे बँक लॉकर नसल्याचा ऑरमचा अहवाल 
  • ऋजुता लुकतुके

देशात बँक लॉकरचा (Bank Lockers) तुटवडा असून येत्या दिवसांमध्ये तो आणखी वाढणार आहे, असा अहवाल ऑरम या स्टार्टअप कंपनीने सादर केला आहे. ही स्टार्टअप कंपनी स्वत: लोकांना सुरक्षित बँक लॉकरची सुविधा उपलब्ध करून देते. ऑरम कंपनीने आगामी १० वर्षांचा आढावाही या अहवालात घेतला आहे. (Bank Lockers)

त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२३ पर्यंत ६ कोटी भारतीय लोकांना आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकरची (Bank Lockers) गरज पडणार आहे. पण, या घडीला देशात फक्त ६० लाख लवकरच उपलब्ध आहेत. त्यामुळे उपलब्ध लॉकर आणि मागणी यांची तफावत ही तब्बल ५.४ कोटी इतकी असेल, असं संस्थेनं म्हटलं आहे. (Bank Lockers)

(हेही वाचा – Public Toilets : प्रत्येक शौचालयांत पूर्णवेळ स्वच्छता)

या कारणांमुळे वाढते बँक लॉकरची गरज

बँकांचे अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेच्या वेळोवेळी प्रकाशित होणाऱ्या अहवालांचा अभ्यास करून हा अहवाल ऑरम संस्थेनं तयार केला आहे. शहरी भागांत बँकांच्या शाखा छोटेखानी असल्यामुळे आणि लॉकर (Bank Lockers) ठेवण्याची जागाच उपलब्ध नसल्यामुळे बँकांनी लॉकरच्या सेवेवर लक्ष दिलेलं नाही, असं ऑरमचं म्हणणं आहे. (Bank Lockers)

भारतीय घरांमध्ये २२,००० ते २५,००० टन इतकं सोनं किंवा सोन्याचे दागिने आहेत. आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना लॉकरची गरज पडते. ही गरज वाढणार आहे. लॉकरची गरज वाढते आहे. त्याचवेळी लॉकरमधील मौल्यवान ठेवी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही बँकांवर वाढतेय कारण, एप्रिल २०१४ ते मार्च २०१७ या कालावधीत बँकांवर दरोडे आणि चोरीमुळे ग्राहकांचं १२० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बँक लॉकर (Bank Lockers) पुरवण्याची सोय करण्याच्या क्षेत्रात बँके व्यतिरिक्त खाजगी संस्थांनाही चांगली संधी आहे असा ऑरमचा अहवाल आहे. (Bank Lockers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.