बँकांचा (Bank) व्यवहार कधी चुकला तर त्याचे काय परिणाम होतात हे तामिळनाड मर्कंटाइल बँके (Tamilnad Mercantile Bank) च्या उदाहरवरून लक्षात येते. या बँकेने चुकून एक टॅक्सी (Taxi) चालकांच्या खात्यात थोडे थोडके नाही तर तब्बल ९ हजार कोटी पाठवले, त्याचा परिणाम म्हणून बँकेचा व्यवस्थापकीय संचालकालाचा राजीनामा द्यावा लागला.
या घटनेमुळे बँकेचे (Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस कृष्णन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेच्या संचालक मंडळाने २८ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत एमडीचा राजीनामाही स्वीकारला आहे. यानंतर रिझर्व्ह बँकेलाही (RBI) ही माहिती देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले. रिझर्व्ह बँकेकडून मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त होईपर्यंत कृष्णन हे या पदावर कायम राहणार आहेत.
चेन्नईचा कॅब चालक राजकुमार याचेही तामिळनाड मर्कंटाइल बँकेत (Tamilnad Mercantile Bank) खाते होते. कॅब (CAB) ड्रायव्हरच्या खात्यात ९ हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला तेव्हा तो चक्रावून गेला. हा फेक मेसेज आहे, असे त्याला वाटले, पण त्याने २१ हजार रुपये त्याच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केले. मात्र अवघ्या अर्ध्या तासात बँकेने ती रक्कम खात्यातून काढून घेतली.
(हेही वाचा Emergency in New York : न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी; 20 तास सतर्कतेचा इशारा)
Join Our WhatsApp Community