ऋजुता लुकतुके
बँक (Bank) कर्मचाऱ्यांची मागच्या कित्येक वर्षांची मागणी अखेर पूर्ण होणार असं दिसतंय. सध्या इंडिया बँक असोसिएशनने तरी त्यांना मान्यता दिली आहे. आता कर्मचाऱ्यांची मागणी केंद्रसरकारच्या कोर्टात आहे. ही मागणी आहे बँकांना प्रत्येक शनिवारी सुटी देण्याची. थोडक्यात बँक कर्मचाऱ्यांनाही आता कॉर्पोरेट जगाप्रमाणेच ५ दिवसांचा आठवडा हवा आहे. २८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत भारतीय बँक (Bank) असोसिएशनचे कर्मचाऱ्यांची मागणी मान्यही केली आहे.
आता असोसिएशनने अर्थ मंत्रालयाकडे तसा अर्ज केला आहे.
सध्याच्या नियमांनुसार, बँक (Bank) कर्मचारी महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करतात. पण, आता त्यांना कुठल्याही शनिवारी काम करावं लागणार नाही. ग्राहकांसाठी याचा अर्थ असा की, बँका प्रत्येक शनिवार आणि रविवारी बंद राहतील. अर्थात, दर दिवशी बँकेचं कामकाज किमान ४५ मिनिटांनी वाढवण्यात येईल.
(हेही वाचा – Meri Mati, Mera Desh : ‘मेरी माटी, मेरा देश’; होणार सन्मान शूरवीरांचा …)
बँक (Bank) कर्मचारी युनियनचं अनधिकृत बोलणं केंद्रसरकारबरोबर आधीपासूनच सुरू होतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य होईल असंच सगळ्यांना वाटतंय. यावर्षी मार्च महिन्यात बँक कर्मचारी युनियनने तसं एक पत्रकही काढलं होतं. ‘बँक कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याला बँक असोसिएशनची तत्त्वतः मान्यता आहे. त्यासाठी दर दिवशी कामाचे तास ४० मिनिटांनी वाढवण्यावरही सहमती झाली आहे,’ असं या पत्रकात म्हटलं होतं.
बँक (Bank) कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावानुसार, दैनंदिन काम सकाळी १० ते ४ पर्यंत सुरू राहील. आणि रोखी शिवायचे व्यवहार साडेचार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. आता बँक कर्मचारी आणि बँक असोसिएशन वाट बघतायत ते अर्थ मंत्रालयाच्या परवानगीची.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community