Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाची नवीन दिवाळी मुदतठेव योजना; मिळणार ७.३० टक्के व्याज

58
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाची नवीन दिवाळी मुदतठेव योजना; मिळणार ७.३० टक्के व्याज
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाची नवीन दिवाळी मुदतठेव योजना; मिळणार ७.३० टक्के व्याज
  • ऋजुता लुकतुके 

दिवाळीच्या निमित्ताने आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या बँक ऑफ बरोदाने विशेष दिवाळी मुदतठेव योजना बाजारात आणली आहे. ही योजना ठरावीक कालावधीसाठीच सुरू असणार आहे. यात ३ कोटीं रुपयांपर्यंतच्या ठेवींवर किमान ७.३० टक्के इतकं व्याज मिळणार आहे. ज्येष्ट नागरिकांसाठी हाच व्याजदर ७.९० टक्के आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ७.९५ टक्के इतका असेल. बँक ऑफ बडोदा उत्सव काळापुरती ही योजना मर्यादित असेल. (Bank of Baroda)

(हेही वाचा- Airline Hoax Threats : खोट्या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचं होतंय एवढं नुकसान)

सणासुदीच्या या कॅम्पेनचा भाग म्हणून बँकेने ३ ते ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठीच्या ठेवींचा व्याजदर वाढवला आहे.  ६.५० टक्क्यांवरून ६.८० टक्क्यांवर नेला आहे. दरात झालेली ही वाढ बीओबी एसडीपी (सीस्टिमॅटिक डिपॉझिट प्लॅन) ग्राहकांनाही लागू होणार असून, त्यांना ३ ते ५ वर्ष प्रत्येक महिन्याचे योगदान देताना उच्च व्याजदर लॉक इन करता येईल. बीओबी एसडीपी ही बँक ऑफ बडोदाची रिकरिंग डिपॉझिट योजना आहे, जी दर महिन्याला नियमित बचतीद्वारे खात्रीशीर परतावा देते. (Bank of Baroda)

निवडक कालावधींच्या बीओबी अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट्सवरचा व्याजदरही ३० बीपीएसपर्यंत वाढविण्यात आला आहे. (Bank of Baroda)

पहिल्यांदाच बँकेने मुदत ठेवी विभागात सुपर सीनियर सीटिझन श्रेणी लाँच केली आहे. यात ८० वर्षापुढील ग्राहकांना ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ते ५ वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी १० बीपीएस अतिरिक्त व्याजाचा लाभ होणार आहे.  (Bank of Baroda)

(हेही वाचा- Onion Express Train : कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी लासलगावहून ‘कांदा एक्स्प्रेस’ थेट दिल्लीला रवाना)

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्ता चंद म्हणाले, ‘ठेवींवर विविध प्रकारच्या ऑफर्स उपलब्ध करून देत सणासुदीच्या या काळात ग्राहकांना अधिकाधिक आनंद मिळवून देताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे ग्राहकांच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. बीओबी उत्सव डिपॉझिट योजना ठेवीदारांना या व्याजदराच्या चक्रामध्ये उच्च दर मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. त्याशिवाय ३ ते ५ वर्ष विभागात लक्षणीय दरवाढ करण्यात आली असून, आम्ही दोन भिन्न प्रकारच्या ग्राहकांना सेवा देत आहोत – त्यातील एक म्हणजे, मध्यम कालावधीसाठी स्पर्धात्मक आणि खात्रीशीर परताव्यांच्या शोधात असलेले ग्राहक, तसेच बीओबी एसडीपीद्वारे प्रत्येक महिन्याला नियमित योगदानाद्वारे बचत करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याच्या ठेवीवर उच्च व्याजदर मिळेल.’ (Bank of Baroda)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.