बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्राहक शुक्रवारी जर कोणताही व्यवहार बँकेत जाऊन करण्याचा विचार करत असालं तर त्यांनी ही बातमी जरूर वाचा. कारण संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रामधील कर्मचारी शुक्रवारी एक दिवसीय संपावर जाणार आहेत. अतिरिक्त ताण वाढत असल्यामुळे आणि नोकर भरती केली जात नसल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माहितीनुसार, राज्यात एकूण बँक ऑफ महाराष्ट्राच्या ७०० शाखा असून कर्मचाऱ्यांची संख्या १३ हजार आहे.
यापूर्वी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने ३० आणि ३१ जानेवारीला संपाची घोषणा केली होती. त्यामुळे येणारा चौथा शनिवार आणि रविवार असल्यानं सलग चार दिवस बँका ठप्प असणार आहेत. दरम्यान यासंदर्भात शुक्रवार बैठकीत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सकारात्मक झाली तर बँक ऑफ महाराष्ट्र २७ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपाचा फटका ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे.
..यामुळे संप पुकारला
बँक संघटनेच्या मते, सध्याची कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढतोय. अशी परिस्थिती असताना बँकेच्या व्यवस्थापनाकडून नोकरी भरती होत नाहीये. तसेच २५० पटीने बँकेचा कारभार वाढला आहे. यामुळे अनेक शाखा वाढल्या आहेत. तरी देखील कर्मचारी संख्या वाढवली जात नाहीये. त्यामुळे यावर तोडगा काढावा, अशी मागणी बँक संघटनेकडून करत एकदिवशी संप पुकारला आहे.
(हेही वाचा – कोटक महिंद्रा बँकेचा ग्राहकांना झटका; कर्ज महागणार, EMIचा बोजा वाढणार)