- ऋजुता लुकतुके
बँक ऑफ महाराष्ट्र जून महिन्याच्या शेवटी १,००० कोटी रुपयांचे टिअर २ बाँड बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. बाँड विक्रीतून दीर्घ कालावधीसाठी पैसा उभा करण्याचा बँकेचा विचार आहे. सध्या मुदतठेवींमधली गुंतवणूक कमी होत आहे. तर कर्जाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी हातात दीर्घ काळासाठी पैसा असावा असा या मागचा विचार आहे. बँकेच्या बाँडचा आकार २५० कोटी रुपयांचा असेल. तर ग्रीन-शू पर्याय हा ७५० कोटी रुपयांचा असेल. (Bank of Maharashtra Share Price)
#Pune based Bank of Maharashtra to raise ₹1000 cr through bonds. IREDA to raise ₹1500 crhttps://t.co/ZF6vA6CJTO
— Maharashtra Inv/Manuf/Tech/Dev Tracking (@abhirammodak) June 19, 2024
बाँडसाठीचा कॉल ऑपशन ते मिळाल्यानंतर ५ वर्षांचा असू शकेल. म्हणजे पाच वर्षांनी तुम्ही ते रिडिम करू शकाल. या बाँडना इक्रा कंपनीकडून एए प्लसचं रेटिंग मिळालं असल्याचंही समजतंय. ३१ मे २०२४ च्या शेअर बाजारात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, बँकेची कर्जाची मागणी १६ टक्क्यांनी वाढली आहे. तर मुदतठेवी जमा होण्याचं प्रमाण तुलनेनं १२ टक्क्यांनीच वाढलं आहे. मुदतठेवींमधूनच बँक कर्जाची रक्कम उभी करत असते. त्यामुळे ही तफावत भरून काढण्यासाठी हे बाँड काढण्यात येणार आहे. (Bank of Maharashtra Share Price)
(हेही वाचा – Kho Kho News : तुषार सुर्वे आणि संजीव ठाकूर देसाई यांना खो-खो ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार)
या बातमीचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्र बँकेच्या शेअर किमतीवरही झाला आहे. बुधवारच्या दिवशी हा शेअर चर्चेत होता. आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मागचे दोन दिवस शेअरच्या किमतीत एका टक्क्याने वाढ झाली आहे. तर सध्या तो ५२ आठवड्यातील उच्चांक ७३.५ अंशांकडे वाटचाल करत आहे. बुधवारी बँकांचे शेअर थोडे थंड होते. त्याचा परिणाम होऊन बँक ऑफ महाराष्ट्राचा शेअरही ०.३२ अंशांनी खाली येऊन ६४.६६ वर स्थिरावला. बाँबे स्टॉक एक्सचेंजमध्येही हा शेअर ६४.६७ वर बंद झालाय. (Bank of Maharashtra Share Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community