बँक ऑफ महाराष्ट्रातील एआयबीइए या संघटनेने बँकेत (Bank) सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पुरेशी नोकरभरती करावी, कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व प्रश्नांवर द्विपक्षीय वाटाघाटीतून तोडगा काढला जावा, कायद्यातील तरतुदीचे, हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करावे या आणि अशा मागण्यासाठी देशव्यापी संप पुकारला आहे. या प्रश्नावर तिसऱ्या फेरीत बुधवार रिजनल लेबर कमिशनर मुंबई यांच्यासमोर चर्चेची आणखी एक फेरी झाली, पण व्यवस्थापन आठमुठी भूमिका घेत असल्यामुळे कुठलाही तोडगा निघाला नाही आणि त्यामुळेच २० मार्चचा संप बँक ऑफ महाराष्ट्रात (Bank) आता अटळ बनला आहे. या दिवशी संघटनेच्या वतीने देशभरातून निदर्शने, मोर्चे, मेळावे, धरणे, मोर्चे अश्या निषेधात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
(हेही वाचा कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींच्या रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही; आमदार Ravindra Chavan यांची ग्वाही)
२० मार्चच्या संपानंतर २१ मार्च एक दिवस बँकेचे (Bank) व्यवहार होतील आणि पुन्हा २२ तसेच २३ मार्च रोजी साप्ताहिक सुटीनंतर २४ आणि २५ मार्च रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन ने केलेल्या आवाहनानुसार सर्व बँकेतील सर्व संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार पुन्हा सर्व बँकांच्या बरोबर बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज त्या दोन दिवशी पूर्ण बंद होईल. यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटनेतर्फे बँक (Bank) ग्राहकांची माफी मागण्यात येत आहे, पण हे लक्षात घ्यावे की, अपुऱ्या कर्मचारी संख्येचा जसा कर्मचाऱ्यांवर अनिष्ट परिणाम होत आहे, तसा बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या ग्राहक सेवेवर देखील परिणाम होईल. हे लक्षात घेता बँक ग्राहकांनी देखील आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे संघटनेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community