“लंचटाइम आहे नंतर या”, हे बँकेत चालणार नाही

दिवसभरात महत्त्वाची कामे उरकण्याची आपली सतत घाईगडबड असतेच. यात बॅंकांची कामेही असतात. पण बॅंकेत गेल्यावर समोरचा कर्मचारी आता लंच टाइम असल्याचे सांगतो. आता लंचटाइम झाला आहे, लंचटाइमनंतर या मग तुमचा नाईलाज होतो. एकतर बॅंकेत बसून राहावे लागते किंवा बॅंकेचे काम सोडून पुढच्या कामासाठी बाहेर पाडावे लागते. परंतु लंच टाइमचे कारण देऊन बॅंकवाले टाळाटाळ करु शकत नाहीत.

माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर रिझर्व्ह बॅंकेने, असे उत्तर दिले आहे की, बॅंकेचे सर्व अधिकारी एकाचवेळी लंचसाठी जाऊ शकत नाहीत. त्यांनी एकेकाने आळीपाळीने जायचे असते. जेवणाच्या वेळेतही बॅंकेचे कामकाज सुरु राहिले पाहिजे. ग्राहकांना ताटकळत ठेवणे हे नियमांच्या विरोधात आहे.

( हेही वाचा: आदित्य ठाकरे केंद्र सरकारच्या रडारवर; अडीच वर्षांत केलेल्या कामकाजाचे होणार ऑडीट )

तक्रार निवारण मंचाकडे जाण्याचा अधिकार

  • ताटकळत ठेवणे, नीटपणे न वागणे, कामात चालढकल करणे अशी वागणूक बॅंक कर्मचा-यांकडून मिळाल्यास, त्यांच्याविरोधात तक्रार करता येते.
  • बॅकांनी ठेवलेल्या तक्रारवहीत तुम्हाला तक्रार करता येते.
  • तक्रार वहीत लिहून काही कार्यवाही न झाल्यास बॅंक मॅनेजर किंवा नोडल ऑफिसरकडे दाद मागता येते.
  • तक्रारीवर मार्ग काढण्यासाठी प्रत्येक बॅंकेत सुरु केलेल्या तक्रार निवारण मंचाकडे न्याय मागता येतो. मंचाकडे लेखी किंवा ई-मेलद्वारे तक्रार करता येते.
  • मंचाचा नंबर बॅक वेबसाइटवर मिळू शकतो किंवा कस्टमर केअरला फोन केल्यास माहिती मिळते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here