- ऋजुता लुकतुके
सर्वसाधारण नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी आपला २४ आणि २५ तारखेचा देशव्यापी संप मागे (Bank Strike Called off) घेतला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या सुटीनंतर आता बँका पूर्ववत सुरू झाल्या आहेत. अर्थ मंत्रालय आणि इंडियन बँक्स असोसिएशनकडून मिळालेल्या सकारात्मक आश्वासनांनंतर हा संप स्थगित करण्याचा निर्णय बँक कर्मचारी संघटनांनी घेतला. त्यामुळे सोमवारी बँका नियमितपणे सुरू झाल्या आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या नऊ बँक कर्मचारी संघटनांची एकत्रित संस्थेनं पूर्वी २४ आणि २५ मार्चला संपाची हाक दिली होती. बँक कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा असावा ही कर्मचाऱ्यांची महत्त्वाची मागणी होती. आणि त्याचबरोबर रिक्त जागा भरण्याची मागणीही करण्यात आली होती.
प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्य कामगार आयुक्तांसमोर घेण्यात आला. ज्यांनी सर्व संघटनांना समंजस्य बैठकीसाठी बोलावले होते. इंडियन बँक्स असोसिएशन आणि अर्थ मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले होते.
(हेही वाचा Traffic Rules : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून मुंबईत १२ कोटी; तर राज्यात ४० कोटींच्या दंडाची वसुली)
आयपीए सोबत झालेल्या बैठकीत, बँक कर्मचारी संघटनेनं बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या समोर ठेवल्या. यात सर्व कॅडरमध्ये भरती आणि पाच दिवसांचा कामाचा आठवडा समाविष्ट आहे. अलीकडेच, या मागण्यांवर अर्थ मंत्रालयाकडून आश्वासन मिळाले आहे, ज्यामुळे मग संप पुढे ढकलण्यात आला. (Bank Strike Called off)
कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदांवर तातडीने नियुक्त्या करण्यात याव्यात. युनियन्सचे म्हणणे आहे की डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे. सरकारी बँक मंडळांच्या स्वायत्ततेवर परिणाम होत असल्याचा आरोप यूएफबीयूने केला आहे. ही मर्यादा २५ लाख रुपयापर्यंत वाढवली जावी, जेणेकरुन ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या योजनेच्या बरोबरीने असेल आणि त्याला आयकरातून सूट मिळेल. (Bank Strike Called off)
Join Our WhatsApp Community