ऑगस्ट महिन्यात १४ दिवस बँका Bank बंद रहाणार आहेत. ४ रविवार आणि २ शनिवारी म्हणजे ६ दिवस बँका बंद राहतील. त्याचवेळी, बँका ८ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बंद असणार आहेत.
कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये २६ ते २९ ऑगस्टपर्यंत सलग ४ दिवस बँका बंद राहतील. २६ ऑगस्ट हा चौथा शनिवार आणि २७ ऑगस्टला रविवार आहे. दुसरीकडे, २८ ऑगस्टला पहिल्या ओणमसाठी आणि २९ ऑगस्टला थिरुनमसाठी बँका बंद राहतील.
(हेही वाचा Population : लोकसंख्येत चीन नंबर वन; 1 जुलैला भारताची लोकसंख्या 139 कोटी)
या महिन्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे या महिन्याची ३ आवश्यक कामे या महिन्याच्या शेवटपर्यंत करुन घ्या. या महिन्यात तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आणि पीएम पीक विमा योजनेसाठी नोंदणी करणे यासारखी कामे ३१ जुलैपर्यंत करून घ्यावी लागतील.
याव्यतिरिक्त, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलै २०२३ सत्रासाठी नवीन प्रवेश आणि पुनर्नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत वेळ दिला आहे. ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते IGNOU च्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in किंवा ignouadmission.samarth.edu.in वर जाऊन ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) प्रोग्रामसाठी नोंदणी करू शकतात.
Join Our WhatsApp Community