पुढील आठवड्यात देशभरातील बँका दोन तर काही भागांमध्ये तीन दिवस बंद राहणार आहेत. प्रत्येक राज्यात होळीसाठी वेगवेगळ्या सुट्या असल्यामुळे बँका बंद राहण्याचा कालावधीही वेगळा असणार आहे. होळीमुळे काही राज्यांत सलग दोन दिवस सुट्या असणार आहेत.
( हेही वाचा : IRCTC चे बजेट टूर पॅकेज! स्वस्तात फिरता येणार दक्षिण भारत, कसा असेल १० दिवसांचा प्रवास?)
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुट्यांच्या वेळापत्रकानुसार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत ७ व ८ मार्चला सलग दोन दिवस बँका बंद राहतील. बिहारमध्ये बँका ८ व ९ मार्चला सलग दोन दिवस बंद राहतील. याचबरोबर पुढील आठवड्यातील शनिवार हा महिन्यातील दुसरा असल्याने या दिवशीही बँका बंद असणार आहेत.
बॅंक हॉलिडे
होळी ७ मार्चला असून, त्यादिवशी महाराष्ट्र, आसाम, राजस्थान, श्रीनगर, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू, श्रीनगर, तेलंगण, झारखंडमधील बँका बंद राहतील. तसेच काही भागांमध्ये ८ मार्चला बॅंका बंद असतील यामध्ये त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, मध्य प्रदेश, ओडिशा, चंडीगड, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, बिहार, छत्तीसगड, मेघालय, हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश होतो. बिहारमधील बँका होळीच्या निमित्ताने ९ मार्चलाही बंद राहणार आहेत. महिन्यातील दुसरा शनिवार ११ मार्चला असल्याने त्यादिवशीही बँका बंद असतील.
Join Our WhatsApp Community